आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 800 Megawatt Electricity Generated In Deepnagar Thermal Power Station

दीपनगरातून 800 मेगावॅट निर्मिती, पुढील महिन्‍यापासून होईल वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- संततधार पावसामुळे राज्यभरातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतून वीजनिर्मितीचा टक्का घसरला आहे. मात्र, दीपनगर केंद्रातून समाधानकारक वीजनिर्मिती होत आहे. सोमवारी दीपनगर केंद्रातून तब्बल 800 मेगावॅट वीज राज्याला मिळाली.

चंद्रपूरनंतर दीपनगरातून द्वितीय क्रमांकाने विजेचे उत्पादन झाले.दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक दोनमधून 127, संच क्रमांक तीनमधून 138, संच क्रमांक चारमधून 329 आणि संच क्रमांक पाचमधून 206 अशी एकूण 800 मेगाव्ॉट वीजनिर्मिती करण्यात आली. राज्यातील चंद्रपूर औष्णिक केंद्रातील दोन संच संततधार पावसामुळे बंद पडले असून या केंद्रातून केवळ 976 मेगाव्ॉट वीज मिळत आहे. या पाठोपाठ परळी, खापरखेडा आणि कोराडी येथील प्रत्येकी दोन संच बंद पडल्याने वीजनिर्मितीची प्रक्रिया घटली आहे. या तुलनेत दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील चारही संचातून समाधानकारक वीजनिर्मिती सुरू आहे. संच क्रमांक दोनच्या आयडी फॅ न आणि संच क्रमांक पाचच्या ट्यूब लिकेजचे काम पूर्ण केल्यानंतर या संचांतूनही वीजनिर्मितीची प्रक्रिया वाढली आहे.