आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजनासाठी 800 टन झेंडू बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन रविवारी होणार असून त्यासाठी तब्बल 800 टन झेंडूची फुले जळगावच्या बाजारात विक्रीस आली आहेत. शनिवार आणि रविवारी त्यांची विक्री होईल.

यंदा कोलकाता येथून आलेल्या झेंडूच्या फुलांना अधिक पसंती आहे. कोलकात्यासह बुलडाणा, घाटमाथा, मुकटी, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील पाळधी, शिरसोली येथून फुले विक्रीस आलेली आहेत. शहरात पाच ते सहा होलसेल व्यापारी आणि शेकडो विक्रेत्यांची यंदा झेंडूने अक्षरश: चांदी केली आहे. ऐन वेळी थांबलेल्या पावसाने आवक वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि गोलाणी मार्केटमध्ये दसर्‍याच्या तुलनेत दिवाळीत जास्त प्रमाणात झेंडू उपलब्ध झाला आहे. 30 ते 60 रुपये किलो होलसेल तर रिटेलसाठी 40 ते 100 रुपये किलो भावाने शनिवारी विक्री सुरू होती. जळगावात दाखल झालेला झेंडूच चोपडा, रावेर, यावल या तालुक्यांमध्ये विक्रीस जात आहे.

दोन वेळा बदलतोय भाव
पहाटे पाच वाजता बाजार समितीत आलेल्या झेंडूचा लिलाव पद्धतीने भाव फुटतो. यानंतर गोलाणी मार्केटमध्ये सकाळी सात वाजता लिलाव होतो. दोन्ही वेळा वेगवेगळा भाव फुटतो. त्यामुळे शेतकरी, व्यापार्‍यांना कधी जास्त नफा तर कधी तोटाही होत असतो. जिल्ह्यातील काही शेतकरी, व्यापारी दुपारच्या वेळी बाजारात झेंडू आणत आहेत. दुपारी आणलेल्या मालाला मनाप्रमाणे भाव मिळण्याची शक्यता असते.


दुकाने, मोठे बंगले यांना लागणारे मोठे तोरण तयार करण्यासाठी फुल विक्रेत्यांची लगबग सुरू आहे. व्यापार्‍यांना 50 ते 500 रुपये फूटपर्यंत तोरण तयार करून विकले जात आहेत.