आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८०० टन बटर, दूध पावडर विक्रीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या जिल्हा दूध संघातील एनडीबीच्या अधिपत्याखालील प्रशासनाने तब्बल ८०० टन बटर आणि दूध पावडर विक्रीचे टेंडर प्रसदि्ध केले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसदि्ध झालेल्या या टेंडरवर हरकत घेत दूध संघ कामगार संघटनेचे डी.के.पाटील यांनी दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे आचारसंहिताभंगाची तक्रार केली आहे. दरम्यान, गुरुवारी पाटील यांनी मुंबईत प्रत्यक्ष पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आचारसंहिता काळात प्रशासक मंडळाला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर निर्णय घेणे अपेक्षित असताना दूध संघाने ५०० टन दूध पावडर आणि ३०० टन बटर विक्रीस काढले असून, यासंदर्भात एका इंग्रजी दैनिकात टेंडर प्रसदि्ध करण्यात आले आहे. तसेच दुसरीकडे दूधसंकलन आणि वितरणासाठी आवश्यक असलेल्या गाड्या भाड्याने घेण्यासाठीदेखील प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या दोन्ही बाबींवर हरकत घेण्यात आली आहे.

आमदार माजी खासदारांसह ३७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
दरम्यान,जिल्हा दूध संघासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे यांच्या दालनात गर्दी झाली होती. गुरुवारी अमळनेरमधून उदय वाघ, जयश्री अनिल पाटील, जामनेरमधून तुकाराम निकम, भास्कर पाटील, प्रल्हाद पाटील, बोदवडमधून मधुकर राणे, पंजाबराव पाटील, धरणगावमधून सोनल पवार, चाळीसगाव तालुक्यातून प्रमोद पाटील, लक्ष्मीकांत पाटील, सुनीता पाटील, रवींद्र पाटील, पाचो-यातून आमदार किशोर पाटील, दिलीप वाघ, सतीश पाटील, जळगावातून आमदार सुरेश भोळे, भडगाव तालुक्यातून धनराज पाटील, वाल्मीक पाटील, मंगला पाटील, संजीव पाटील, सचनि पाटील, पारोळ्यातून अॅड.वसंतराव मोरे, चोपड्यातून मनोहर पाटील, सदाशिव पाटील, अशोक चौधरी, भारत इंगळे, मुक्ताईनगरमधून शरद महाजन, यावल तालुक्यातून नितीन चौधरी, आमदार गुलाबराव पाटील हेमराज चौधरी, एरंडोलमधून नाना पाटील दगडू चौधरी, भुसावळमधून श्यामल झांबरे, अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून उदय अहिरे, महिला राखीवमधून सोनल पवार, साधना पाटील, सुनीता पाटील, जयश्री पाटील, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून साधना पाटील, अॅड.वसंतराव मोरे, साहेबराव पाटील, वाल्मीक पाटील, संजीव पाटील, गुलाबराव पाटील, रवींद्र पाटील, विमुक्त जाती प्रवर्गातून सुनीता पाटील मंगेश पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दुग्धविकासमंत्री खडसे यांच्याकडे तक्रार
जिल्हादूध संघाच्या निवडणूक काळात धोरणात्मक निर्णय घेतल्याप्रकरणी दूध संघ कामगार संघटनेचे डी.के.पाटील यांनी गुरुवारी मुंबईत ‘रामटेक’ या निवासस्थानी कृषी, पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे लेखी तक्रार केली. खडसे यांनी यासंदर्भात सचिवांना सूचना दिल्यानंतर उपनिबंधक दुग्ध यांच्यामार्फत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांना फॅक्सद्वारे ही प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारदार डी.के.पाटील यांच्या तक्रारीनुसार पुणे आणि यावल येथे साठा असलेले १५०० टन दूधपावडर आणि १००० टन बटर विक्री काढण्यात आले असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३० ते ३५ कोटी रूपये आहे.
दूध संघाने ५०० टन दूधपावडर आणि ३०० टन बटर विक्रीचे टेंडर काढले आहे. विक्री टेंडरला स्थगिती देण्यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. मनोजलिमये, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा दूध संघ