आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमचा ‘पासवर्ड’ विचारून तरुणाचे ८५ हजार लांबवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत एटीएमचा पासवर्ड विचारून समतानगरातील तरुणाच्या खात्यातून चोरट्यांनी ८५ हजार ३१८ रुपये काढूून घेतल्याची घटना १८ ते २३ जूनदरम्यान घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. चोरट्यांनी मुंबईसह विविध ठिकाणी मॉलमधून खरेदी केली तसेच मोबाइलचे बिलही अदा केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्यांनी शनिवारी रामानंदनगर पाेलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

समतानगरातील जुबेर करीम खाटीक (वय २६) हे खाटकाचा व्यवसाय करतात. त्यांच्या वडिलांनी महिनाभरापूर्वी सुप्रीम काॅलनीतील प्लाॅटची विक्री केली होती. यातून लाख रुपये मिळाले हाेते. ते पैसे खाटीक यांनी स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या शाखेत ठेवले हाेते. त्यातील केवळ १३ हजार ८०० रुपये त्यांनी खर्च केले होते. जुबेर यांच्या माेबाइलवर १८ जून राेजी सकाळी १०.३० वाजता ७८०८६७३४६१ या क्रमांकावरून कॉल अाला. त्याने बँकेचा अधिकारी राहुल शर्मा बाेलत असल्याचे हिंदीतून सांगितले. तुमचे एटीएम कार्ड महिन्यांसाठी बंद करण्यात अाले असून ते सुरू करायचे असेल तर त्यासाठी एटीएम कार्डचा पासवर्ड अाणि अाधार कार्डचा क्रमांक द्यावा लागेल, असे सांगितले. जुबेर यांना १५ दिवसांपूर्वीच एटीएम कार्ड मिळाल्याने ते बंद हाेईल, या भीतीने त्यांनी राहुल शर्मा यांना एटीएम कार्डचा पासवर्ड सांगून टाकला. त्यानंतर राहुल शर्मा याने अामच्या बँकेचे वरिष्ठ अधिकारी विकास चव्हाण बाेलत असल्याचे सांगितले. लगेच दुसऱ्या व्यक्तीने एटीएम कार्डवरील इतर माहिती घेतली. तसेच पैसे काढल्यानंतर तुम्हाला मेसेज येताे का? असे विचारले. त्यानंतर एटीएमच्या मागच्या बाजूला असलेला अाकडी क्रमांक विचारला. काही वेळानंतर एक महिला खाटीक यांच्याशी बाेलली. तिनेही काही माहिती घेतली. त्यानंतर तुमचे कार्ड अाता ब्लाॅक हाेणार नाही, असे सांगून माेबाइल ठेवला.

ईदसाठीही पैसे उरले नाहीत
काहीदिवसांवर ईद येऊन ठेपली अाहे. बँकेतून पैसे काढून कुटुंबीयांसाठी खरेदी करण्याचे खाटीक यांनी ठरवले हाेते. त्यासाठीही ते पैसे काढण्यासाठी गेेले होते. मात्र, बँकेच्या खात्यात केवळ ८८२ रुपये शिल्लक असल्याचे बघून त्यांचे अवसानच गळाले हाेते. अाता ईद कशी साजरी करायची? हा प्रश्न त्यांच्यासमाेर उभा राहिला अाहे.

नव्या टाेळ्या सक्रिय
एटीएमकार्डचा पासवर्ड विचारून लुबाडणाऱ्यांमध्ये अातापर्यंत नायजेरियन टाेळ्या सक्रिय हाेत्या. मात्र, अाता काही बिहारी, उत्तर प्रदेशच्या टाेळ्यांनीही सध्या धुमाकूळ घातला अाहे. अनेकवेळा बिहारमधून माेबाइलवरून फाेन करून या प्रकारे लुबाडले गेल्याच्या घटना घडल्या अाहेत. या प्रकरणातही त्याच प्रकारे फसवल्याचा संशय पाेलिसांना अाहे.

२७ वेळा काढले पैसे
खाटीकयांच्या खात्यातून १८ ते २३ जूनदरम्यान २७ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे काढले होते. त्यात माेबाइल बिले, माॅलमध्ये काही वस्तू घेऊन त्याचा भरलेल्या बिलांत समावेश आहे. मुंबई, नाेएडा, गरुगाव या ठिकाणाहून चाेरट्यांनी खरेदी करून पैसे खाटीक यांच्या एटीएम कार्डमधून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

सावधानता बाळगा : कोणत्या बँकेतून अथवा विमा पॉलिसीबाबत ग्राहकाला फोन केले जात नाही. त्यामुळे मोबाइलद्वारे अनोळखी व्यक्तीने एटीएमच्या पासर्वडची विचारणा केल्यास देऊ नये, त्वरीत बँकेशी संपर्क साधून सावधानता बाळगावी.

२३ जूनला पैसे नसल्याचे अाले लक्षात
जुबेरखाटीक हे दर गुरुवारी बँकेतून पैसे काढतात. त्यानंतर ते शुक्रवारी मध्य प्रदेशातील मनावर येथे बकरे विकत घेण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे ते २३ जूनला बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. त्यांच्या पासबुकमध्ये ८६ हजार २०० रुपये खात्यावर असल्याचे दाखवत हाेते. त्यामुळे त्यांनी २६ हजार रुपयांची विड्राॅल स्लिप भरली. मात्र, खात्यावर ८८२ रुपये ८५ पैसे असल्याचे कॅशिअरने सांगताच खाटीक यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
बातम्या आणखी आहेत...