आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासेसद्वारे महिन्याकाठी साडेनऊ लाखांचे उत्पन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवास करणा-यांना आपल्या गावातच पासेस काढण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आगाराने वरणगाव आणि कुऱ्हे प्र.न.या दोन गावांमध्ये पास वितरण केंद्र सुरू केले आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात भुसावळ आगारातून (१२६१), तर वरणगाव येथून (३०८) आणि कुऱ्हे प्र.न. येथील केंद्रातून (२४९) विद्यार्थ्यांना पासेस वितरित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पासधारक विद्यार्थ्यांची संख्या ३४२ ने वाढली आहे. शविाय, मासिक (१९२) त्रैमासिक (१३०) पासेस तर १० टक्के सवलतीच्या दरातील (४१) पासेस आगाराने यंदा वितरित केल्या आहेत. या सर्व पासेसमधून आगाराला दरमहा लाख ५३ हजारांचे उत्पन्न मिळत आहे.
प्रवाशांची संख्या घटल्यामुळे भुसावळ बस आगाराच्या उत्पन्नावर गेल्या काही महिन्यांपासून विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, परविहन महामंडळाने सुरू केलेल्या सवलतीच्या दरातील पासेसच्या ववििध योजनांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे पासधारकांची संख्या वाढत असल्याने बस आगाराच्या उत्पन्नाची मदार पासधारकांवर अवलंबून आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पासधारक शालेय विद्यार्थ्यांची संख्या ३४२ ने वाढली आहे. त्यामुळे आगाराला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे राज्य परविहन महामंडळाचे उत्पन्न घटले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महामंडळाने प्रवासीहिताच्या अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणा-या ंसह आगारातर्फे विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात पासेस दिल्या जातात.

मोफत सुविधा : ग्रामीणभागात ज्या गावांमध्ये शाळा नाहीत, अशा गावातील विद्यार्थिनींना, शिक्षणासाठी मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील २७५ शालेय विद्यार्थिनींनी आगाराच्या या सुविधेचा लाभ घेतला आहे.

आवडेल तेथे प्रवास : परविहनमहामंडळाने उत्पन्न वाढीसाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजना सुरू केली आहे. योजनेंतर्गत चार सात दविसांच्या प्रवासासाठी सवलतीच्या दरातील पासेस मिळतात.चार दविसांच्या प्रवासाकरिता ४१ तर सात दविसांसाठी दोन पासेस वितरित केल्या जातात.

ज्येष्ठांचाही समावेश
मासिकत्रैमासिक सर्व्हिस पास, आवडेल तेथे प्रवासासाठी चार किंवा सात दविसांची पास, १० टक्के सवलतीच्या दरातील पास अशा सवलतींच्या दरातील पासेस प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. आपल्या गरजेप्रमाणे प्रवासी पासेस काढतात. पास काढणा-यांमध्ये अपंगांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असतो.
उत्पन्नात भर : शालेयविद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या मासिक पासेसमधून आगाराला दरमहा लाख ४९ हजार १८० रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी तालुक्यातील हजार ८१० विद्यार्थ्यांनी पासेसचा लाभ घेतला आहे. जास्ती जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

प्रवाशांना सुविधा देण्याचा प्रयत्न
^दैनंदिनप्रवास करणारे नोकरदार आणि व्यावसायिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा, सवलतीच्या दरातील पासेसकडे कल वाढला आहे. पासधारकांसह सर्वांना प्रवासादरम्यान प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एम.बी.पांडव, वरिष्ठ लिपिक, पास विभाग, भुसावळ आगार