जळगाव - महापालिकेच्या मक्तेदारांचे पेमेंट अदा केल्याने १५० कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यानंतर कायम कर्मचार्यांवर ताण वाढला आहे. त्यात आता निविदा काढून साफसफाईचा ठेका दिलेल्या पाच मक्तेदारांनीदेखील काम करण्याची मानसिकता केली आहे. तसेच १५ दिवसानंतर कचरा उचलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात अस्वच्छतेचे संकट निर्माण होईल.
शहरातील वॉर्डांतील साफसफाईचे काम मक्तेदारांमार्फत करण्यासाठी नोव्हेंबर २०१४मध्ये निविदा काढल्या होत्या. त्यात मयूरा बचत गट, भीमज्योत महिला बचत गट, रामयोग मजूर सहकारी सोसायटी, साई मल्टी सर्व्हिसेस, साई इन्व्हेस्टिगेशन सर्व्हिसेस या पाच संस्थांना काम सोपवले होते. काम सुरू केल्यानंतर तीन महिन्यांनी पेमेंट अदा करायला सुरुवात होईल असे महापालिका प्रशासनाने मक्तेदाराना सांगितले होते; परंतु आज पाच महिने उलटले तरी पेमेंट अदा केलेले नाही. त्यामुळे कामगारांनाही वेतन अदा करणे मक्तेदारांसाठी अडचणीचे ठरत आहे. दररोज चकरा मारूनही मार्ग निघत नसल्याने अखेर काम थांबवण्यापर्यंत विचार पोहोचला आहे. त्यासाठी ते १५ दिवसांची मुदत महापालिकेला देणार आहे. त्यानंतरही पैसे मिळाल्यास थेट काम बंद करण्याची भूमिका मक्तेदारांनी घेतल्याची माहिती रूपेश ठाकूर यांनी दिली.
१३ वॉर्डांची प्रक्रिया संथ
वॉर्डांव्यतिरिक्त आणखी १३ वॉर्डांतील स्वच्छतेचे काम मक्तेदारामार्फत करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. परंतु आधीच्याच मक्तेदारांचे लाखो रुपये पालिकेने अदा केल्याने मक्तेदार या ठिकाणी काम करायला तयार होतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.