आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनरमधून 9 लाखांच्या 90 एलईडी टीव्हींची चाेरी, चालक झोपलेला असताना चाेरट्यांनी घातला धुमाकूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी पाेलिसांचा माेठा फाैजफाटा मिरवणूक इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी तैनात हाेता. ही संधी साधत चाेरट्यांनी मंगळवारी रात्री १० ते बुधवारी पहाटे वाजेदरम्यान एमआयडीसीतील हॉटेल त्रिमूर्ती समोर उभ्या असलेल्या कंटेनरमधून ओनिडा कंपनीचे सुमारे ९० एलईडी टीव्ही लंपास केले. चाेरी गेलेल्या एका एलईडीची किंमत १० हजार २९० रुपये म्हणजे ९० टीव्हीची िकंमत ही लाख २६ हजार १०० रुपये एवढी असून कंपनीचे मोठे नुकसान झाले अाहे. तसेच चाेरट्यांनी हाॅटेल त्रिमूर्तीत देखील चाेरी केली असून तेथून त्यांनी ७० हजारांची रोकड लंपास केली अाहे.

भिवंडीतील वाडा परिसरातून १२ एप्रिल रोजी चालक अक्षयकुमार पांडेय (वय ४५, रा.उत्तर प्रदेश) हे काेलकाताच्या साऊथ-इस्ट रोडवेज या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरमध्ये (क्रमांक सीजी ०४ जेबी ६६७९) ओनिडा कंपनीचे एलईडी अन्य उत्पादने घेऊन काेलकाता येथील खिदीलपुरा येथे जाण्यासाठी निघाले होते. मंगळवारी रात्री वाजता पांडेय जळगावात पोहोचल्यानंतर त्यांनी हॉटेल त्रिमूर्ती समोर कंटेनर उभा करून कॅबिनमध्ये झोपले होते. ते बुधवारी पहाटे वाजता लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरले असता त्यांना कंटेनरचा मागचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहिले तर टीव्हीसह काही साहित्य चाेरीस गेल्याचे त्यांना दिसले. याविषयी त्यांनी तत्काळ दूरध्वनीवरून कंटेनरमालक ओझा यांना माहिती दिली. नंतर एमअायडीसी पोलिस ठाण्यात जाऊनही याविषयी माहिती दिली. मात्र, अद्याप याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान कंटेनरमधून ९० एलईडी टीव्ही लंपास झाले असून त्या सर्वांची िकंमत ही लाख २६ हजार १०० रुपये एवढी अाहे.

हॉटेल मधून रोकड लंपास
मंगळवारीड्राय डे असल्यामुळे हॉटेल त्रिमूर्ती बंद होती. याचा फायदा घेत चोरट्यांनी हॉटेलच्या किचनचे सिमेंटचे पत्रे तोडून हॉटेलात प्रवेश केला. काउंटरमध्ये ठेवलेली ७० हजार रुपयांची रोकड त्यांनी लांबवली. हॉटेलात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांची कोणतीच ओळख राहिलेली नाही. दरम्यान अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमअायडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत. दरम्यान कंटेनरमधून एलईडी लंपास करणाऱ्या चोरट्यांनीच हॉटेलातही चोरी केल्याचा पाेलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

धारदार वस्तूने कापले सील
कंटेनरच्यामागील दरवाजाला चार इंचीचे प्लास्टिकचे सील होते. हे सील एखाद्या धारदार वस्तूने कापून दरवाजा उघडला अाहे. त्यानंतर चाेरट्यांनी दुसरे वाहन मागे उभे करून त्यातून टीव्ही वाहून नेले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा परिसर ट्रान्सपोर्टिंगचाच असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मालाची चढ-उतार सुरू असते. त्यामुळे चोरी हाेत असल्याचे कुणाच्याही लक्षात अाले नसावे.

एकट्याने चालवले कंटेनर
पांडेयहे एकटेच कंटेनर चालवत होते. त्यांच्यसाेबत क्लीनरही नव्हता. दोन दिवस ड्रायव्हिंग करीत ते जळगावात पोहाेचले होते. एकटेच चालक असल्यामुळे प्रचंड थकवा आल्याने ते मंगळवारी रात्री लवकर झोपले होते. तसेच त्यांना रात्रीतून एकदाही जाग आली नाही. त्यांनी कंटेनर उभे केले तेंव्हा शेजारीच दोन ट्रकमधून माल उतरवण्याचे काम सुरू होते. ते रात्री उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे त्यांनी त्याकडेही लक्ष दिले नसल्याचे पांडेय यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

...तर झाली नसती चाेरी
पांडेयहे जळगावातील मामा ट्रान्सपोर्टकडून पुढील प्रवासासाठी लागणारे पैसे घेण्यासाठी थांबले होते. पैसे घेतल्यानंतर मंगळवारीच रात्री वाजेच्या सुमारास ते भुसावळ मार्गाने पुढचा प्रवास करणार होते. मात्र, ट्रान्सपोर्टवर गेल्यानंतर पैसे मिळाले नाहीत. बुधवारी सकाळी पैसे मिळतील, असा निरोप त्यांना मिळाला होता. त्यामुळेच त्यांना जळगावात मुक्काम करावा लागला.

भिवंडीहून व्यवस्थापक येणार
कंटेनरमध्येकिती कोणते साहित्य होते, यांची नोंद भिवंडी येथील वाडा येथेच करण्यात आली आहे. ९० एलईडी टीव्ही चोरीस गेल्याचा पांडेय यांचा प्राथमिक अंदाज अाहे. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कंटेनर लोड केल्यानंतर बिलटी तयार करणाऱे व्यवस्थापक जळगावी येऊन पंचनामा करीत नाही तो पर्यंत नेमका किती माल गेला हे स्पष्ट होणार नाही. व्यवस्थापक आल्यानंतरच पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही कंटेनर चालक पांडेय यांनी सांगितले.