आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये जुगार खेळताना नगरसेवकास पकडले, लाखो रुपयांचा मुद्देमाल, वाहने जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- यावल येथे पत्याच्या जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली असून या एका नगरसेवकाचा समावेश आहे. भुसावळ विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्या पथकाने हा छापा टाकला. त्यात 12 जुगारींना पकडण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता हा छापा टाकण्यात आला. हडकाई नदीकाठावर पत्ता खेळतांना रंगेहात पकडलेल्या आरोपींमध्ये यावल नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक अभिमन्यु चौधरी यांचा देखील समावेश आहे.

 

 

या कारवाईत 7 वाहने, एक लाख 75 हजार रुपयांची रोकड, साडेपाच लाख रुपयाचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे. कारवाई पथकात भुसावळचे  विभागीय सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल यांच्यासह उपनिरिक्षक अशोक खरात, हवालदार चेतन पाटील, समाधान पाटील, राजेश काळे, संकेत  झाबरे, विशाल सपकाळे यांचा समावेश होता.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...