आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: दहावीच्या 'माय मराठी'च्या पहिल्याच पेपरला 13 काॅपीबहाद्दरांवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दहावीच्या परीक्षेला गुरुवारीपासून सुरुवात झाली. अायुष्याच्या टर्निंग पॉईंट परीक्षा असल्याने परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाेबत पालकांची माेठी गर्दी झाली हाेती. पालक मुलांना धीर देऊन त्यांना परीक्षा केंद्रावर पाठवत हाेता. तर दुसरीकडे शिक्षण विभागाच्या पथकाने देखील चाेख नियाेजन केले हाेते. पथकाने वेगवेगळ्या केंद्रांना भेट देऊन माय मराठीच्या पेपरला १३ काॅपीबहाद्दरावर कारवाई केली.

 

शिक्षण विभागाने साेनवद येथील काबरे विद्यालयामध्ये ४ विद्यार्थी, भालाेद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ५ विद्यार्थी, वरणगावच्या महात्मा गांधी विद्यालयात १ विद्यार्थी, वरणगावच्याच चाैधरी विद्यालयात २ अाणि किन्ही येथील सर्वोदय विद्यालयात पथकाने एका विद्यार्थ्यावर कारवाई केली.

 

परीक्षा केंद्रावर गोंधळ घालणाऱ्या चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई
पाळधी येथील दहावीच्या एका परीक्षा केंद्रावर काॅपीवरुन चौघांनी प्रचंड गोंधळ घातला. यामुळे दोन समुदायात तेढ निर्माण झाला होता. धरणगाव पोलिसांनी इजाज शहा मेहबूब शहा (वय २१), मजहर खान साबीर खान (वय २८), गोकुळ रघुनाथ सोनवणे (वय २४) व नितीन समाधान सोनवणे (वय १९) यांना ताब्यात घेतले हाेते. या चौघांना सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. परीक्षा केंद्रावर पाेलिस बंदाेबस्त वाढविण्यात यावा अशी मागणी करण्यात अाली अाहे.  


प्रशासन व पोलिसांचा हाेता चाेख बंदोबस्त
परीक्षा केंद्रांवर उपद्रवींकडून विद्यार्थ्यांना काहीही त्रास होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्रात व केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता. तसेच प्रशासनाकडून देखील भरारी पथकांकडून परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवले जात होते. त्यामुळे काही केंद्र वगळता बाहेरून कॉपी पुरवणाऱ्या उपद्रवींपासून परीक्षार्थींना काहीही त्रास झाला नाही.


पालकांचे पाल्यामागे सूचनांचे ओझे
पाल्य प्रथमच बोर्डाची अर्थात दहावीची परीक्षा देत असल्याने पालकांनी ही परीक्षा परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. प्रथमच बोर्डाची परीक्षा देत असलेल्या पाल्यामागे पालक घरापासून ते मुलगा परीक्षा हॉलमध्ये जाईपर्यंत विविध सूचना करताना दिसत होते. पालक मुलांना शाळेचे आयकार्ड, हॉल तिकीट, पेन, पेन्सिल, खोडरबर, शाॅपनर घेण्यापासून ते व्यवस्थित पेपर लिहिण्याची सूचना देखील आपल्या मुलांना करत होते.

बातम्या आणखी आहेत...