आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध भुकटी निर्यातीवर प्रतिकिलो ५० रुपये अनुदान; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दुधाच्या दरात वाढ हाेण्यासाठी दूध भुकटी निर्यातीवर प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला अाहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते अाले हाेते. त्या वेळी भाजपचे उमेदवार पांडुरंग काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


बोंडअळीचे अनुदान 
गेल्या वर्षी बाेंडअळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याबाबत विचारले असता, राज्य शासनाने ३ हजार काेटी अनुदान देण्याचे मंजूर केले अाहे. अातापर्यंत १ हजार ८ काेटी अनुदान वाटप करण्यात अाले अाहे. उर्वरित २ हजार काेटी अनुदान प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले असल्याचे महसूूलमंत्री म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...