आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परत येणाऱ्या पित्याचा अपघातात जागीच मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करून परत येत असताना पांडुरंग पोपट कोळी यांचा अपघातात जागीच मृत्यू झला. शनिवारी दुपारी भुसावळ ते वरणगाव दरम्यान ही घटना घडली. मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते खाली कोसळले. अपघातानंत तासभर ते रस्त्यावर पडून होते. दरम्यान पोलिस कॉस्टेबल विजय सोनवने माहिती मिळाल्यानतंर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कोळी यांना रुग्नालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


पांडुरंग कोळी हे भगीरथी शाळेतील निवृत्त शिक्षक होते. येत्या 8 मे रोजी त्यांच्या मुलगा गणेश कोळीचे लग्न होते. मुलाच्या लग्नाची घरात सर्व तयारी झाली आहे. आवश्यक सर्व गोष्टींचे बुकिंगही देखील करण्यात आले होते. परंतु, अवघ्या 10 दिवसांवर मुलगा गणेश याचे लग्न आले असताना पित्याचा मृत्यू झाल्याने के. सी. पार्क परिसरात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...