आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये दुचाकींच्या अपघातात युवकाचा मृत्यू; 2 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघाताच्या ठिकाणी जमलेली गर्दी. - Divya Marathi
अपघाताच्या ठिकाणी जमलेली गर्दी.

यावल (जळगाव)- तीन तासांपुर्वी यावलहून नवी दुचाकी खरेदी केली व कोळन्हावी (ता.यावल) येथे घरी पुजा करून फेर-फटका मारायला निघालेल्या तरूणाच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीशी धडक होत अपघात घडला. त्यात समोरील दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर दोेघे जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास डांभुर्ण -कोळन्हावी रस्त्यावर घडली. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आलेे तर तब्बल अडीच तास मृताचा मृतदेह घटनास्थळावर पडून होता.

 


कोळन्हावी (ता. यावल) येथील रहिवासी नरेंद्र अशोक सोळुंके याने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास यावलच्या सदगुरू आॅटोमधुन नवी दुचाकी खरेदी केली व तो कोळन्हावी येथे घेऊन गेला. घरी दुचाकीची पुजा केल्यावर दुपारी चारच्या सुमारास तो फेरफटका मारण्याकरीता कोळन्हावीहुन डांभुर्णीकडे येत होता. तेव्हा डांभुर्णीकडून जळगावकडे दुचाकीद्वारे (क्र. एम. एच. 19 ए. जी. 1826) जगदिश योगराज पवार (वय 42, वर्ष रा.कवठळ ता. धरणगाव) हे आपल्या सोबत अन्य एक जणासोबत जात होते. दरम्यान दोघे दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात पवार हे जागीच ठार झाले तर नरेंद्र सोळुंके व एक अन्य जण जखमी झाला. दोघांना घटनास्थळावरून धानोरा येथील 108 वाहनाद्वारे जिल्हा सामान्य रूगणालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. तर या अपघाताची माहिती यावल पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनरिक्षक अशोक आहिरे व हवालदार संजीव चौधरी हे रवाना झाले. पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले आहे. उशीरा पर्यंत यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू हाेते.

 


अडीच तास मृतदेह पडून
अपघातानंतर पोलिस घटनास्थळी येईपर्यंत तब्बल अडीच तास मृतदेह रस्त्यावर पडून होता. अनेकांनी रस्त्यावरील ये जा करणाऱ्या वाहनांना विनंती केली मात्र कुणीच मृतदेह नेण्यास तयार झाले नाही. अखेर पोलिस दाखल झाल्यावर मृतदेह यावलला नेण्यात आला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती