आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत खडसे, भुजबळ, इनामदार यांचा संबंध उघड करू - अंजली दमानिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर/जळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे कल्पना इनामदार आणि छगन भुजबळ यांचा काय संबंध आहे, हे येत्या तीन दिवसांत उघड करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे. खडसेंच्या बदनामी प्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीसाठी दमानिया सोमवारी जळगाव जिल्ह्यातील रावेर न्यायालयात आल्या होत्या. 


माजी मंत्री खडसे यांच्या बदनामी प्रकरणी भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अंजली दमानिया यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावले होते. या अनुषंगाने दमानिया यांनी सोमवारी रावेर न्यायालयात हजेरी लावली. न्यायाधीश डी. जे. मालवीय यांच्यासमोर त्यांनी स्वत: युक्तिवाद केला. दमानिया यांना जातमुचलक्यावर जामीन देऊ नये, असे प्रतिवादी वकिलांनी म्हटले. मात्र, सुनावणीअंती न्यायालयाने 15 हजारांचा जातमुचलका व 300 रुपये दंड ठोठावून दमानिया यांच्या विरोधातील पकड वॉरंट रद्द केले. कादेशिर प्रक्रीया पार पाडल्यानंतर दमानिया यांनी पत्रकांरांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...