आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात परीक्षा देणाऱ्याला उपकरणाने आैरंगाबादेतून उत्तरे; पोलिस भरतीतील मुन्नाभाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स उपकरण वापरणारा- मदन डेडवाल - Divya Marathi
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स उपकरण वापरणारा- मदन डेडवाल

जळगाव- पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उमेदवारास गुरुवारी जळगावात पोलिसांनी पकडले. उमेदवाराने आपल्या उजव्या दंडावर इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले होते. या उपकरणाच्या साह्याने तो आैरंगाबाद येथे बसलेल्या मित्राशी संभाषण करून उत्तरे लिहिणार होता. परीक्षेला बसण्यापूर्वी डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर तपासणीतून जाताना ‘बीप’ वाजला. या तरुणाची चौकशी करताच त्याचे बिंग फुटले. परीक्षा देणारा हा तरुण आणि त्याचा मित्र दोघेही अौरंगाबादचे रहिवासी आहेत.  


मदन महाजन डेडवाल (२१, रा.जोडवाडी, मु.पाे.कचनेर, ता.जि.औरंगाबाद) असे या मुन्नाभाईचे नाव आहे. तर त्याच्याच गावात राहणारा रतन प्रेमसिंग बहुरे हा मोबाइलवरून त्याला प्रश्नांची उत्तरे सांगणार होता. दोघांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलातील ११२ जागांसाठी १२ मार्चपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मैदानी चाचण्यांमध्ये यशस्वी झालेले उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले होते. त्यांची परीक्षा गुरुवारी सकाळी ६.४५ वाजता घेण्यात आली. दरम्यान, या परीक्षेस बसण्यापूर्वी उमेदवारास मोबाइल फोन, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास किंवा जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही मदनने उजव्या हाताच्या दंडाला चिकटपट्टीच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक उपकरण बांधले होते.   

 

‘कॉडलेस इयर फोन’ कानावर लावला होता. बंदुकीच्या बुलेट प्रमाणे दिसणारा इअर फोन बाहेरून सहजपणे दिसत नाही. दरम्यान, या  उपकरणाच्या माध्यमातून मदनचा मित्र रतन हा त्याला आैरंगाबादेत बसून  प्रश्नांची उत्तरे सांगणार होता. परीक्षेला जाण्यापूर्वी मदनने उपकरण सुरू  केले. यानंतर तो आत जात होता. या वेळी डिटेक्टरमधून जातना ‘बीप’ आवाज झाला. त्याच्या   हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी मदनची चौकशी सुरू केली. शारीरिक तपासणी केली असता त्याच्या उजव्या हाताच्या दंडावर उपकरण  लावलेले आढळून आले. पोलिसांनी   कसून चौकशी केल्यानंतर त्याच्या कानातून ‘काॅडलेस इयर फोन’ काढण्यात आला. मदनला मैदानी चाचणीत तब्बल ९४ गुण मिळाले होते. त्यामुळे लेखी परीक्षेत कॉपी करण्याची अवदसा का आठवली, असा प्रश्न पोलिसांनाही  पडला होता. 

 

असे असते उपकरण  
इलेक्टॉनिक्स डिव्हाइस हे उपकरण म्हणजे मोबाइल नाही. परंतु त्यावर येणारे कॉल रिसिव्ह करता येतात. त्यात मोबाईलप्रमाणे सीमकार्ड असते. याच सिमकार्डच्या नंबरवर समोरून फोन केल्यानंतर उपकरण वापरणारी व्यक्ती फोन रिसिव्ह करू शकते. यानंतर दोघांना संभाषण करता येते.  

पुढील स्लाईडवर पहा, उपकरण वापरणारा आरोपी मदन डेडवाल व उपकरणाचे फोटो.....

बातम्या आणखी आहेत...