आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा येथील हल्ला सरकारपुरस्कृत अातंकवादच : आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा (नंदुरबार)- राजे संभाजींच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन गोविंद गायकवाड यांना वंदन करण्यासाठी अनेक जण जातात; परंतु १ जानेवारी रोजी वातावरण दूषित झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव भीमा येथे धुडगूस घातला. अनेक गाड्या जाळल्या. पोलिसांदेखत हा हल्ला झाला. हा हल्ला म्हणजे सरकारपुरस्कृत आतंकवादच होता, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला.


 येथील जनता चौकात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची रविवारी सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले,  इंग्रजांच्या काळात पेशवाई दफन झाली होती; परंतु भाजपच्या राज्यात दफन केलेल्या पेशवाईची भुते पुन्हा बाहेर येऊ लागली आहेत. सरकारविरुद्ध बोलणे म्हणजे देशद्रोह संबोधण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतमातेला लोकशाहीचे वस्त्र घातले तेच वस्त्र बदलण्याचे षडयंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणामुळे सुरू झाले आहे. संविधान हे बहुजन, ख्रिश्चन, अल्पसंख्याक, दलित, आदिवासींचे शस्त्र आहे. संविधान कदापिही बदलू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.  

बातम्या आणखी आहेत...