आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती झाली तर ठीक नाही तर BJP स्वबळावर लढणार; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नगरपालिका, महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणूक स्वबळावर लढल्याने आगामी काळात युती झाली तर ठीक नाही तर भाजप येणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता शिवसेनेची मदत न घेता स्वबळाचा नारा देत जिल्ह्याजिल्ह्यात मेळाव्यांचे आयोजन सुरु केले आहे. जळगावात आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. पक्षाचा वर्धापन दिनाची जाहीर सभा मुंबईत घेणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली. येत्या 6 एप्रिल रोजी पक्षस्थापना दिवसाच्या सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुख्यमंत्री आणि अन्य मंत्री या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील असे महाजन म्हणाले.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...