आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव- अंजली दमानियांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकनाथ खडसेंची फसवणूक केल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अन्य पाच जणाविरुद्ध माजी मंत्री व भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दमानिया आणि त्यांच्या सहका-याविरोधात ,बनावट दस्तऐवज बनविणे ,दस्तऐवजाची चोरी करणे अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने 156 (3) नुसार पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

एक महिन्यापूर्वी मुक्ताईनगर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधीक्षकांना तक्रार देऊनही गुन्हा दाखल केला नसल्याने खडसेंनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी मुक्ताईनगर प्रथम वर्ग न्यायालयात या बाबत तीन तास युक्तिवाद झाला यावर न्यायालयाने  १५६ (३) नुसार सदर प्रकरणात 24 तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावर आज दुपारी साडेअकरा वाजता मुक्ताईनगर पोलिसांत स्वतः खडसे यांनी न्यायालयाचे आदेश सादर करून दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु र क्रमांक 116 भादवी कलम  379,380,420,465,466,467,468,469,471,474,120 ब आणि श कलम 34 प्रमाणे दाखल या गुन्ह्यात अंजली दमानिया (मुंबई), रोशनी राऊत (मुंबई), गजानन मलपुरे (जळगाव), सुभाष परशुराम कुऱ्हाटे (मुंबई), सदाशिव व्यंकट सुब्रमन्याम (मुंबई), चारमेन फनर्स (मुंबई) या  सहा जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...