आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शहरात सर्वच शाळांनी यंदा गाठली 'शंभरी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात अाला. शहरात सीबीएसई पॅटर्नच्या ८ शाळा असून सर्वच शाळांचे निकाल १०० टक्के लागले. यात ओरिऑन सीबीएसई स्कूलची किमया चौधरी हिने ९८.८० टक्के गुण मिळवत शाळेसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. 


सीबीएसई दहावीच्या निकालात शहरातील सर्व शाळांनी १०० टक्के यश मिळवल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी अानंद व्यक्त करुन जल्लाेष व्यक्त केला. दुपारी ३ वाजता जाहीर हाेणाऱ्या निकालाची सकाळपासून विद्यार्थी व पालकांमध्ये कमालीची उत्सुकता हाेती. ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी संगणक, माेबाइलच्या माध्यमातून निकाल जाणून घेतला. तर शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निकालाची छाननी करून शाळेत प्रथम, द्वितीय तसेच ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यंंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे. टॉपरमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक अाहे.


काशिनाथ पलोड स्कूल
काशिनाथ पलोड स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. शाळेत १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. २७ विद्यार्थी ८० टक्क्यांहून अधिक, २९ विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त तर १८ विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले अाहे. अायुष येवले व रिया पाटील या विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात १०० गुण मिळाले अाहे. तसेच शाळेत प्रथम क्रमांक आयुष येवले (९७.८०), द्वित्तीय क्रमांक सर्वेश भंगाळे (९७.२०), तृतीय क्रमांक आकांशा दांडगे (९४) टक्के, चाैथा क्रमांक चिराग मंधान (९३.२०), पाचवा क्रमांक अादित्य राऊत व सर्वेश चांडक (९३.२०) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. संस्थेच्या अध्यक्षा शाेभा पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, काेषाध्यक्षा हेमा अमळकर, शालेय समिती अध्यक्ष धनंजय जकातदार, प्राचार्य अमित भाटिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव केला. 


यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षक, पालकांतर्फे काैतुकाची थाप 
सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लाेष केला. त्या वेळी रुस्तमजी स्कूलची ईशा चाैधरी (खाली बसलेली) डावीकडून निशिका कोगटा, गरीमा जैन, श्रीनिधी तेली, अनन्या मैढ, अक्षद जैन, समय साेनजे, चिराज अग्रवाल, माेहीत बेहराणी, प्रतीक चाैधरी 


पोदार इंटरनॅशनल स्कूल
पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम क्रमांक सानिका अग्रवाल (९४.६०), द्वित्तीय क्रमांक कौस्तुभ घारे (९४.६०), तृतीय क्रमांक अभिषेक पांडे (९४.२०) टक्के मिळवले. 


केंद्रीय विद्यालय
केंद्रीय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम क्रमांक वीणा पाटील (९३), द्वित्तीय क्रमांक प्रियांशू पाटील (८६) व वैभव पाटील (८६), तृतीय क्रमांक जितेंद्र पाटील (८५) टक्के मिळवले. 


अोरिअाॅन स्कूल
ओरिऑन स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम क्रमांक किमया चौधरी (९८.८०), द्वित्तीय क्रमांक आशिष पाटील (९८), तृतीय क्रमांक रोहन कोम्बे (९४.२०) टक्के मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात अाला. 


रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल
स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक ईशा चौधरी (९७.८), द्वित्तीय श्रीनिधी तेली (९७.४), तृतीय समय सोनजे (९६.२), चाैथा निशिका कोगटा (९५.८), पाचवा हर्षा चावला (९४.८) टक्के मिळवले. 


गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी स्कूल
शाळेचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम क्रमांक सिद्धी चौधरी (९४.२), द्वित्तीय सर्वस्वी पाटील (९२.२),तृतीय गायत्री चांदसारे (९०.८), चाैथा क्रमांक नेहा चौधरी (९०.२) टक्के मिळवले. 


सेंट जोसेफ स्कूल
सेंट जोसेफ स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. ४७ विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा अधिक गुण आहेत. यात प्रथम क्रमांक आयुष वालेचा (९७.२), द्वित्तीय क्रमांक विधूषी बैद (९६.२), तृतीय क्रमांक अनुष्का नीळे (९५.६)हिने मिळवला. 

बातम्या आणखी आहेत...