आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार पुलावरून कोसळली, पती-पत्नीसह तिघांचा अपघाती मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा- भरधाव जाणारी कार पुलावरून ६० ते ७० फूट खोल नदीच्या पात्रात कोसळली. या भीषण अपघातात जळगावातील दाम्पत्यासह तीन जण ठार झाले. रविवारी खामगाव ते मलकापूर महामार्गावरील कोलासर पुलावर ही घटना घडली. 


जळगाव येथील रहिवासी वसंत नाले व डाॅ.अर्जुन कोळी हे दाेघे मित्र आपल्या पत्नीसोबत (एमएच- १९ बीजे- ५६१४) या कारने नांदुऱ्याकडून जळगावकडे येत होते. रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास वडी- कोलासर पुलाजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार पुलावरून ६० ते ७० फूट खोल नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली. या भीषण अपघातात अलका वसंत नाले (वय ५७) व प्रांताबाई कोळी (५६, रा. जळगाव) या दोन महिला घटनास्थळीच ठार झाल्या आहेत. डाॅ.अर्जुन काेळी (६४) यांना उपचारासाठी जळगावकडे अाणत असताना निधन झाले. वसंत नाले यांना किरकोळ मार लागला आहे. डॉ. कोळी यांनी गेल्याच वर्षी कार विकत घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...