आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसे यांच्या बदनामी प्रकरणातील खटल्यात अंजली दमानियांना 13 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर (जळगाव)- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामी प्रकरणी रावेर न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात अंजली दमानिया यांना आता 13 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दवाखान्याचे काम व मुलगी जान्हवी हिच्या लग्नाच्या स्वागत समारंभामुळे त्या हजर राहू शकत नाही, असा युक्तीवाद अंजली दमानिया यांचे वकील अॅड. सुधीर कुलकर्णी यांनी केला होता. त्यामुळे त्यांना आता 13 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.

 

 

अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या अनेक आरोपांविरोधात भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी रावेर न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये दमानिया यांना अटक वॉरंट काढण्यात आले होते. यावेळी त्यांना कॅन्सर असल्याने उपचार सुरु आहे म्हणून हजर राहता येऊ शकत नाही असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. यामुळे त्यांचे वॉरंट रद्द करून त्यांना 7 मार्च तारीख देण्यात आली होती. आज पुन्हा दमानिया यांचे वकील अॅड. सुधीर कुलकर्णी यांनी युक्तिवाद करत उपचार व मुलीच्या स्वागत समारंभ असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले. यावर भाजप तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांच्या वतीने चंद्रदीप पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्या. डी. जी. मालवीय यांनी आता एप्रिल महिन्यात 13 तारखेला त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.      

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...