आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या माळ्यावरून पडून विवाहितेचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर - शहरातील बनोसा भागातील शिवाजी नगर येथील विवाहितेचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १० जानेवारील सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. सुनीता उमेश चांडक (४२) असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनेच्या वेळी घरातील अन्य मंडळी त्यांच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होती.

 

यामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. मृतक महिलेचा पती उमेश चांडक हे व्यावसायिक अाहेत. गेल्या काही दिवसांपासून चांडक यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. वरच्या मजल्यावरील साइड गॅलरीची सुरक्षा जाळी काढून नवीन बसवण्याचे काम सुरू आहे. घटनेच्या वेळी मृतक सुनीता या कपडे वाळवण्यासाठी जात होत्या. दरम्यान त्यांना चक्कर आल्याने त्या जाळीचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून तोल जाऊन खाली सिमेंट रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला त्वरित दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतक सुनीता यांच्या मागे पती, दोन मुली एक मुलगा आहे. या घटनेमुळे चांडक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बातम्या आणखी आहेत...