आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावत चित्रपट जळगावात प्रदर्शित न करण्याचा निर्णय; प्रदर्शक संघांच्या बैठकीत शिक्कामाेर्तब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सिने दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी यांच्या 'पद्मावत' या वादग्रस्त चित्रपटाचे प्रदर्शन जळगाव शहरात हाेणार नाही, असा निर्णय जळगाव चित्रपट प्रदर्शक संघाने घेतला आहे. 
येत्या २५ जानेवारी राेजी 'पद्मावत' प्रदर्शित हाेत आहे. त्याबाबत प्रदर्शक संघाची बैठक शनिवारी झाली. बैठकीस राजकमल सिनेमागृहाचे संचालक महेंद्र लुंकड, अाॅयनाॅक्स मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापक वैभव शहा, नटवर मल्टिप्लेक्सचे मेहुल त्रिवेदी, अशाेक सिनेमागृहाचे व्यवस्थापक अार.डी. चाैधरी, रिगल व मेट्राे थिएटरचे संजय सुराणा यांची उपस्थिती हाेती. 


यावेळी अामदार सुरेश भाेळे व हिंदुत्ववादी संघटनाच्या प्रतिनिधींनी बैठकीला भेट देऊन चित्रपट प्रदर्शित करू नये,अशी मागणी केली. यानंतर चित्रपट प्रदर्शक संघाने जळगावात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...