आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासनांची पूर्तता न झाल्याने धर्मा पाटील यांच्या पत्नीचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई यांनी दिला आहे. त्यांनी पतीचा अस्थी कलश घेत, मुलगा नरेंद्र पाटीलसोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि निवेदन दिले.

 


वीज प्रकल्पासाठी संपादित जमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासन दरबारी चकरा मारुनही न्याय मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथील 84 वर्षीय धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करुन स्वतःच जीवन संपवले. या घटनेला दीड महिन्याचा कालावधी होऊन देखील सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.

 


जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे नसल्याने सखुबाई यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देत सरकारच्या ढिम्म कारभाराचा निषेध व्यक्त केला.
न्याय मागण्यासाठी पतीला जीव गमवावा लागला, असे बोलत असताना सखुबाई यांचे अश्रू अनावर झाले.

 


ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेले आश्वासन मान्य नसल्याचे सखुबाईंनी यावेळी सांगितले. सरकारने दिलेली 48 लाखांची मदत देखील मान्य नसल्याने योग्य न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 
बातम्या आणखी आहेत...