आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात वर्षभरात 74 हजारांवर मतदार वाढले; शहरात 8 हजार 196ने मतदार संख्या वाढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वर्षभरात निवडणूक आयोगाव्दारे करण्यात आलेल्या नोंदणीमध्ये जिल्ह्यात १० जानेवारीपर्यंत मतदार यादीमध्ये ७४ हजार २४६ नवीन मतदारांची भर पडली. तर ९७ टक्के मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र आहे. विशेष म्हणजे चोपडा तालुक्यातील सर्व मतदारांकडे ओळखपत्र अाहे. 


जिल्ह्यात जानेवारी २०१७ अखेर पर्यंत ३२ लाख २० हजार ७०३ मतदार होते. त्यामध्ये १६ लाख ९७ हजार ९७० पुरूष तर १५ लाख २२ हजार ६६२ महिला तर तृतीयपंथी ७१ मतदारांचा समावेश होता. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात युवा मतदारांची संख्या कमी असल्याने जिल्हा निवडणूक विभागाने विशेष मतदार नोंदणी मोहिम राबवली. महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांना या मोहिमेसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नेमण्यात आले. युवा मतदारांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणी कक्ष सुरू करण्यात आले. १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. इतर मतदारांचीही नोंदणी प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार १० जानेवारीपर्यंत मतदार यादीमध्ये ७४ हजार २४६ नवीन मतदारांची भर पडली. यात जळगाव शहरात ८ हजार १९६ मतदारांची संख्या वाढली आहे. 


३८ हजार मतदारांची नावे वगळली 
मतदार याद्यांमध्ये दुबार, स्थलांतरीत, मृत मतदारांची नावे आढळली हाेती. याविषयी निवडणूक विभागातर्फे दुबार नावे व स्थलांतरीत मतदारांचे एक नाव यादीतून वगळण्याबाबत नोटीस दिली होती. त्यानंतर निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३८ हजार ७६६ मतदारांची नावे यांद्यांमधून वगळली आहेत. यात २२ हजार ७५२ पुरूष तर १६ हजार १२ महिला मतदारांचा समावेश होता. 


मतदारसंघानुसार संख्या 
चोपडा (२ लाख ९५ हजार ६३०), रावेर (२ लाख ८७ हजार ६९४), भुसावळ (२ लाख ९२ हजार ५४), जळगाव शहर (३ लाख ५८ हजार ९९१), जळगाव ग्रामीण (३ लाख २४ हजार २५), अमळनेर (२ लाख ८० हजार ८०४), एरंडोल (२ लाख ६८ हजार ११२), चाळीसगाव (३ लाख ३८ हजार ९७), पाचोरा (२ लाख ९७ हजार ३३३), जामनेर (२ लाख ९४ हजार ५७९), मुक्ताईनगर (२ लाख ७९हजार २३०).

बातम्या आणखी आहेत...