आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाराेळा (जि. जळगाव)- शिक्षक दांपत्याच्या अकरावीत शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अनुप प्रदीप भावसार (१७) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
विद्यानगरात बालाजी शिक्षक प्रदीप बाबूराव भावसार व शिक्षिका अर्चना भावसार हे दांपत्य राहते. बुधवारी सकाळी दोघेही शाळेत निघून गेले. या वेळी अनुप हा घरी एकटाच होता, तर त्याची बहीण अपूर्वा ही शिकवणीसाठी बाहेर गेली होती. अनुपने सकाळी ८ ते ९ वाजता शिकवणीचा एक तास केला. त्यानंतर ताे शिकवणीचा दुसरा तास न करता घरी परतला. शेजाऱ्यांकडून किल्ली घेऊन १५ मिनिटांत घर बंद करून पुन्हा किल्ली त्याने शेजारी ठेवली. त्यानंतर ताे पुन्हा घरी परतला. वही घ्यायची, असे सांगून त्याने शेजारून किल्ली घेतली. त्यानंतर ताे १५ मिनिटे झाली तरी बाहेर अाला नाही. दरम्यान, त्याची बहीण अपूर्वा ही शिकवणी अाटाेपून घरी अाली. तिला घराचे दार उघडे दिसले. घराच्या खाेलीत डाेकावून पाहिले तर अनुपने दाेराने गळफास घेतल्याचे दिसले. शेजाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो ...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.