आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी वीज बिले भरणार नाहीत, 30 एप्रिलला जेलभरो आंदोलन; सुकाणू समितीचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- शेतकरी सुकाणू समिती टप्प्या टप्प्यात आंदोलन करणार आहे. कारण या सरकारला आता शेतकऱ्यांची भाषा कळू देण्यासाठी तीव्र आंदोलनच करावे लागणार आहे. एकदा मटका किंग रतन खत्रीवर या राज्यातील लोकांचा विश्वास आहे, परंतू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजिबात विश्वास नाही, अशी टीका शेतकरी नेते रघूनाथदादा पाटील यांनी सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेतून केली. तर कॉ. किशोर ढमाले यांनी शेतकरी वीज बिले भरणार नाहीत, 30 एप्रिलला जेलभरो आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. 

 


विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सत्यशोधक चळवळीचे कॉ. किशोर ढमाले, भारिप बहूजन महासंघाचे नाना ठाकरे, अरूण रामराजे, लोकसंघर्ष मोर्चाचे संजय महाजन, गणेश जगताप्र, कॉ. रामसिंग गावित, काथ्या गावित,सु भाष काकुस्ते आदी  उपस्थित होते.

 


पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे काम आम्ही करणार आहोत. 23 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान सभांमधून जागृती केली जाईल. त्यानंतर जेलभरो आंदोलन करण्यात येईल. मंत्रालय आता सुसाईड पॉईंट ठरू लागले आहे. आत्महत्येवर उपाययोजना ऐवजी मुख्यमंत्री जाळे लावण्याचे काम मंत्रालयांच्या इमारतीवर करीत आहेत. जनता एकवेळ रतन खत्रीच्या चिठ्ठीवर विश्वास ठेवायला तयार आहे. परंतू फडणवीस यांच्या बोलण्यावर नाही. यांच्या घोषणा नेहमीच बदलत असतात. त्या उलट कल्याणमध्ये फूटलेला मटक्याचा आकडा हा तालुका पातळीवर बदलत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

 


गणेश जगताप म्हणाले, राज्य शासनाने शेतक-यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत फसवेगिरी केली आहे. नीरव मोदींसारखे चार जण चाळीस हजार कोटी बूडवून फरार होतात. त्या उलट आम्ही दीड कोटींच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीची मागणी करीत आहोत. शासनाला काहीच कळत नाही. फडणवीस यांचे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...