आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा तालुक्यात वटार येथे शॉर्टसर्किटने घराला आग; सर्व वस्तू जळून खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगीत जळून खाक झालेल्या वस्तू. - Divya Marathi
आगीत जळून खाक झालेल्या वस्तू.

चोपडा (जळगाव)- तालुक्यातील वटार येथे कोळी वाड्यातील शरद अर्जुन ठाकरे यांच्या घराला सकाळी नऊच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. या घटनेत त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

 


घराला आग लागली तेव्हा शरद ठाकरे हे गावात होते तर त्याच्या घरातील अन्य सदस्य शेतात कामासाठी निघून गेले होते. घरातून धूर निघू लागल्यावर स्थानिकांच्या आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी आग विझवण्याच्या प्रयत्न केला मात्र आगीत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत रोख 25 हजार रुपये, पाच ग्रॅम सोन्याचे डोरले, 5 पोती गहू, तांदूळ एक कट्टा, कपाट, घरातील लाकडी पलंग, कपडे जळून खाक झाले. तलाठी प्रकाश झाडे यांनी पंचनामा केला असून पोलिस पाटील रवींद्र पाटील यांनी घटनेची माहिती दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चोपडाचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी तलाठी प्रकाश झाडे यांना पंचनामा करण्याची कारवाई करून पंचनामा सादर करण्यास सांगितले आहे.