आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंना क्लिन चिट मिळताच खासदार रक्षा खडसे यांच्‍या दत्‍तक गावात फटाक्‍यांची आतिषबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) खडसेंना क्लीन चिट मिळाली आहे. खडसेंविरुद्ध आरोप ‍सिद्ध न झाल्याचे एसीबीने त्यांना क्लीन चिट दिल्याचं माहिती पडताच खडसेंच्या सुन व खासदार असलेल्‍या रक्षा खडसे यांनी दत्तक घेतलेल्या चोपडा तालुक्यातील हातेड बु. गावात उपसरपंच मनोज सनेर यांच्‍या टीमने फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.

 

गावात यावेळी एकनाथ खडसे जिंदाबाद, खडसे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. हातेड बु. येथे  विनोद सोनवणे, रवींद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, कल्पेश सोनवणे, दिलीप सनेर, मयुरेश सोनवणे, सतीश सोनवणे, राहुल सनेर, शुभम सोनवणे, जितेंद्र सुर्वे, रविंद्र सनेर, सुनील बाविस्कर, सुखदेव भिल, प्रभाकर भिल, बाळू भिल मनोज बाविस्कर, हितेंद्र बाविस्कर आदी गावकरी यावेळी ग्रामपंचायत चौकात फटाके फोडण्यासाठी जमा झाले होते.

बातम्या आणखी आहेत...