आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांचे विमानाने मुंबईला जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होणार, दुपारी 1 वाजता उड्डाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेच्या हिंदाेळ्यावर उडणाऱ्या विमानसेवेला अखेर शनिवारी खऱ्या अर्थाने सुरुवात हाेणार अाहे. एअर डेक्कन कंपनीचे जळगाव ते मुंबई विमान शनिवारी दुपारी कुसुंबा येथील विमानतळावर लॅण्ड हाेईल. त्यानंतर लगेचच दुपारी एक वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन हाेऊन विमान उड्डान घेईल. जळगावात प्रथमच व्यावसायिक विमानसेवेचा श्रीगणेशा हाेईल. शुक्रवारी विमानतळावर अावश्यक त्या सुविधांची पडताळणी अपूर्ण कामांना अंतिम रुप देण्याची लगबग सुरू हाेती.

 

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या उडान याेजनेंतर्गत देशातील विविध शहरातून विमानसेवा सुरू करण्यात येत अाहे. यातील दुसऱ्या टप्प्यात नाशिक, काेल्हापूर, साेलापूर, जळगाव नांदेड या पाच शहरांतील विमान सुविधा सुरू करण्यात येणार हाेती. जळगाव शहरापासून 7 किलाेमीटर अंतरावर असलेल्या कुसुंबा या गावाच्या हद्दीत सन १९७४ साली उभारलेल्या विमानतळाचा सर्वसामान्यांना वापर सुरू करण्यास तब्बल ४३ वर्षांची वाट पहावी लागली अाहे. दरम्यान, १३ जून २०१० ला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या आगमनासाठी विमानतळाच्या धावपट्टीत वाढ केली हाेती. या विमानतळावर शंकरराव चव्हाण, मधुकरराव चाैधरी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी अादी ज्येष्ठ नेत्यांसह अनेक मुख्यमंत्र्यांचे अागमन झालेले अाहे.

 

प्राधिकरणाची रंगीत तालिम
विमानसेवेच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला प्राधिकरणाने रंगीत तालिम घेतली. प्राधिकरणाचे स्थानिक अधीक्षक विकास चंद्रा यांनी टीमसह शुक्रवारी विमानतळाची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी यांनीही अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...