आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर- राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय अशी अाेळख असलेले अमळनेरचे माजी अामदार साहेबराव पाटील हे भाजपच्या तंबूत दाखल झाले. बाजार समितीत गुरुवारी (दि.१८) अायाेजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह तीन मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपत प्रवेश देऊन स्वागत करण्यात अाले.
व्यासपीठावर सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, माजी केंद्रीय मंत्री एम. के. पाटील, विजय नवल पाटील, आमदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, पंचायत समितीचे सभापती वजाबाई भिल, बाजार समिती सभापती उदय वाघ, उपसभापती अनिल अंबर पाटील, पंचायत समिती उपसभापती त्रिवेणीबाई पाटील, अर्बन बँक चेअरमन भरत ललवाणी, व्हाइस चेअरमन मिराबाई निकम, खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
दाेन वर्षात ३० हजार काेटींतून १० हजार कि.मी. रस्ते बांधणार
सरकार आगामी २ वर्षात ३० हजार कोटी रुपये खर्चातून १० हजार किलाेमीटर अंतराचे रस्ते बांधणार. त्यात २२ हजार किमी चाैपदरी, १० हजार किमी तीन पदरी असे रस्ते होतील, अशी माहिती राज्याचे बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. अमळनेर बाजार समितीच्या विकासकामांचे उद््घाटन व भूमिपूजन गुरुवारी झाले. यानिमित्त अायाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. उत्पन्नाचे स्त्राेत व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला तरच बाजार समित्या भविष्यात टिकू शकतील. अन्यथा, त्यांना बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. गेल्या कालवधीत पाणी साठवण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान १६ हजार गावांत राबवण्यात अाले. यातून जलपातळी वाढली, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.