आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पादचाऱ्यांना रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, म्होरक्यासह 3 भामट्यांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पादचाऱ्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह दोघांना रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी जामनेर येथून अटक केली. त्यांनी बुधवारी आदर्शनगरात पायी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे लाख रूपये लुटल्याची कबुली दिली आहे.

 

धीरज महारू राठोड , सिकंदर गफ्फार पटेल (वय २८ , रा.रामनगर, जळगाव) आणि सनी संजय बिऱ्हाडे (वय १८, रा.आंबेडकरनगर खेडी, ता.जळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दि. २० डिसेंबर रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाजवळून आदर्श नगरात पायी जात असलेल्या जनार्दन पाटील यांना रिक्षातून आलेल्या तिघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर रिक्षात बसवून भर दुपारी लाख रूपये लुटले होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. मात्र,त्या रिक्षाला वाहन नोंदणी क्रमांक नव्हता.


पुढच्या काचेवर ‘साईकृपा’ असे लिहिलेले होते. या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. मात्र, संशयितांचा तपास लागला नाही. त्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकास लुटण्यात आलेल्या पद्धतीवरून तपास सुरू केला. अशा प्रकारे पादचाऱ्यांना लुटण्याच्या प्रकरणातील गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीतून या तीन संशयितांची नावे समोर आली. त्यानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर.एम.ठाेंबरे, प्रदीप चौधरी, विनोद शिंदे, अतुल पवार, ज्ञानेश्वर कोळी सागर तडवी यांनी शुक्रवारी डोहळी तांडा जामनेर येथून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द शहर, एमआयडीसी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

 

नवीनटोळी तयार करून लुटायचा
धीरजराठोड या हा प्रत्येक वेळेस नवीन टोळी तयार करून पादचाऱ्यांना लुटायचा. रस्त्याने पायी जात असलेल्या वृध्द किंवा महिला पादचाऱ्यास जवळच असलेल्या ठिकाणाचाच पत्ता विचारायचा. त्यांनी पत्ता सांगितल्यावर रिक्षात बसवून त्या ठिकाणापर्यंत चालण्याची विनंती करायची. त्यांना रिक्षात बसवायचे. रिक्षात दोन ते तीन साथीदार आधीच बसलेले असायचे. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश असायचा. पादचारी रिक्षात बसल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर पैसे, सोने लुटायचे. ही त्यांची गुन्ह्याची पद्धत होती.

बातम्या आणखी आहेत...