आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी हाेण्यास नकार दिला म्‍हणून तरुणीचा खून, आईची फिर्याद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रामानंदनगर परिसरातील महाविद्यालयीन तरुणीस ७ जून २०१७ रोजी दंगलग्रस्त कॉलनीतील तरुणाने पळवून नेले होते. या तरुणीचे धर्मांतर करून तीला दहशतवादी कृत्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर तरुणीने नकार दिल्यानंतर तीचा खून करून पुरावे नष्ट करण्यात आल्याप्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर येथील पूजा (नाव बदललेले) हीस दंगलग्रस्त कॉलनीतील शेख वसीम शेख अहेमद याने पळवून नेले होते. तत्पूर्वी वसीम याने पूजाचे धर्मांतर केले होते. यानंतर मुंबईत तीच्यासोबत निकाह केला. दरम्यान, निकाहनंतर पूजाच्या आई-वडिलांनी तिच्याशी संपर्क केला होता. या वेळी तिने वसीमकडून त्रास दिला जात असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी तिचा मोबाइल बंद झाला हाेता. यासंदर्भात पूजाच्या वडिलांनी वसीमच्या कुटुंबीयांकडे देखील चौकशी केली. परंतु, आम्हास या विषयी काहीच माहित नाही, असे उत्तर वसीमच्या कुटुंबीयांनी दिले. यामुळे पूजाच्या कुटुंबीयांचा संशय बळावला हाेता.


दरम्यान, वसीम व त्याचे साथीदार आपणास दहशतवादी कृत्यात सहभागी करणार असल्याचे पूजाने आईला फोनवर सांगितले होते. अनेक दिवस पूजाचा मोबाइल बंद हाेता तर वसीमच्या कुटुंबीयांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळू लागली होती.


त्यामुळे पूजाच्या वडिलांनी न्यायालयात दाद मागितली हाेती. सुनावणीअंती न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश गुरूवारी रामानंदनगर पोलिसांना दिले हाेते. त्यानूसार पूजाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वसीम याच्यासह शेख अहेमद शेख तुरान, सागीराबी शेख अहेमद, शेख इम्रान शेख अहेमद, शेख अब्दुल अजीज, सईद जमुल अजीज शेख, साहिल खान अयुब खान, काझी मोहम्मद इस्लाम यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बी. जे. रोहम तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...