आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकापडणे (धुळे)- एकुलत्या एका भावाचा मृत्यू झाल्यानंतर खचुन न जाता धनुर (ता. धुळे) येथील दीपाली जगदीश पाटील या विद्यार्थिनीने अाज (दि.21) दहावीचा पेपर दिला. दीपाली ही येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थिनी आहे.
इयत्ता पाचवीत असणाऱ्या पवन जगदीश पाटील या तिच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाल्यानंतरही तिने पेपर दिला. पवन काही दिवसापुर्वी अाजारी पडला व त्याला अचानक किडनीचा दुर्धर आजार जडल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास अाले. या अाजाराची माहिती मिळाल्यावर मोठा अाघात झालेल्या या कुटुंबाने उपचार सुरु केले परंतू त्याला यश अाले नाही. अवघ्या सहा दिवसात पवनचा मृत्यू झाला. आपल्या भावाच्या अशा अचानक जाण्याने दीपालीला धक्का बसला. पण या दुखातून सावरत तिने आज पेपर दिला. कालच भावावर अंत्यसंस्कार केल्यावर आज परीक्षा देणाऱ्या दीपालीला पाहून केंद्रावरील शिक्षकांचेही मन गहिवरून आले. दीपालीची आई, दोन बहीण, काका, काकू, आजी, आजोबा यांनीही तिला परीक्षा देण्यास पाठबळ दिले. दीपालीच्या वडिलांचेही 2011 मध्ये निधन झालेले आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.