आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या पोटात खुपसला सुरा, जळगावमधील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काही एक कारण नसताना दारुच्या नशेत तर्र असलेल्या पतीने पत्नीच्या पोटात सुरा खुपसल्याची घटना साेमवारी दुपारी २ वाजता घडली. या प्रकरणी दारुड्या पतीवर एमअायडीसी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

विठ्ठल आत्माराम नेरकर (वय ३५, रा. दत्तनगर) असे संशयिताचे नाव आहे. विठ्ठल याने सोमवारी दुपारी २ वाजता पत्नी खातुनबी नेरकर हिच्यासह मुलास मारहाण करण्यास सुरूवात केली. मुलाने घरातून बाहेर पळ काढला. त्याच्या मागे विठ्ठल देखील बाहेर आला. त्याची पत्नी खातुनबी हिने मारहाण करण्यास विरोध करताच विठ्ठलने कमरेत खोचलेला सुरा काढून तिच्या पोटात खुपसला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विठ्ठल याला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. पाेलिसांनी मंगळवारी सुरा हस्तगत केला अाहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे हे तपास करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...