आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगरमध्ये रंगाचा बेरंग... 11 वीच्या विद्यार्थ्याचा डोहात बुडून मृत्यु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- शहरात युवक व नागरीक धूलिवंदनाच्या धुरळवर रंगत असतांनाच जुने मुक्ताई मंदीरावरील घाटावर चार  मित्रांसह गेलेला 11 वीचा एक विद्यार्थी अचानक पाय घसरून पाण्याच्या डोहात पडुन मृत्यु झाल्याची घटना काल (शुक्रवारी) सकाळी साडेनऊ वाजता घडली. शहरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच धूलिवंदनाच्या आनंदावर विरजन पडले.

 

सविस्तर वृत्त असे की, शहरातील वैष्णवीनगरमध्ये राहणारा 11 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रशांत सुरेश चव्हाण (वय-18) हा त्याच्या 3 मित्रांसह होळी खेळून रंगाने भरलेले हातपाय धुण्यासाठी कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरावरील नदीच्या घाटावर गेला होता. सोबत गेलेल्या सर्व मित्रांपैकी कोणालाच पोहता येत नव्हते. त्यामुळे घाटावरील पायरीवर बसून सर्व मित्र हातपाय धूत होते. इतक्यात प्रशांत चव्हाणचा अचानक तोल गेल्याने तो पाण्याच्या डोहात पडला. मित्रांमधून कोणालाच पोहता येत नसल्याने मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरड केली. मात्र जवळपास कोणीही नव्हते. मात्र सोबतच्या मुलांपैकी एकाने शहरात मोबाइलद्वारे माहिती देत मदतीची याचना केली. हे वृत्त शहरात वाऱ्यासारखी पसरले. शहरातून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे यांचे स्विय्य सहाय्यक योगेश कोलते, माजी सरपंच ललित महाजन, सुभाष सनांसे, बबलु कोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच शेकडो नागरिकांचा तसेच महिलांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यासाठी धावपळ केली. तत्काळ मुक्ताईनगर येथील गोपी भिल्ल व संजय भिल्ल पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना आणले व पाण्यात पडलेल्या प्रशांतचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी संतोष चव्हाण यांच्या खबरीवरुन पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे.

 

प्रशांत हा तालुक्यातील अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्णवाहिका चालक सुरेश चव्हाण यांचा मुलगा असून त्याच्या पश्चात आई, वडील एक भाऊ व दोन बहीणी असा परीवार आहे. आज (शनिवारी)  दुपारी 12 वाजता प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...