आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • विहिरीत पोहल्याने दलित समाजाच्या तीन मुलांना अमानुष मारहाण, नग्न धिंडही काढली Beating Minor Boy In Jamner Wakadi

जामनेरात विहिरीत पोहले म्हणून मातंग समाजाच्या 2 मुलांना विवस्र करुन अमानुष मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहून पळ काढणाऱ्या मागासवर्गीय समाजातील दोन अल्पवयीन मुलांना शिक्षा म्हणून विवस्र करून पट्ट्याने मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. (घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ...पुढील स्लाइड्‍सवर)

 

विशेष म्हणजे शेतमालक शेताकडे येत असल्याचे पाहून पलायन करणाऱ्या या मुलांचा शेतमालक आणि शेतावरील सालदाराने 4 किलोमीटर पाठलाग करून त्यांना पकडले. एवढे दूर पळवल्याचा राग आला म्हणून मालक आणि सालदाराने दोन्ही मुलांना पट्ट्याने अमानुषपणे झोडपले. गेल्या रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ खुद्द मालकानेच मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल केला आणि या मारहाणीचे बिंग फुटले.

 

दरम्यान, मारहाण करणारा शेतमालक आणि त्याचा गडी दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना जळगाव न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वाकडी (ता. जामनेर) येथील ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहिरीत काही मुले पोहत होती. जोशी हे शेतावरील सालदार प्रल्हाद कैलास लोहार यांच्यासह शेतात आले. मालक आल्याचे लक्षात येताच विहिरीतून दोघे बाहेर निघाले.

 

चुकी झाली, यापुढे येणार नाही.... मुलांची वारंवार विनवणी
मारहाण करताना सालदार आणि मुलांमध्ये झालेले संभाषण. या संभाषणावेळी तिसरा मुलगाही चित्रफितीमध्ये दिसतो. या वेळी पट्टा पाहून केविलवाण्या चेहऱ्याने मुलांनी वारंवार चुकी झाली,यापुढे करणार नाही, अशी विनवणी केली. परंतु सालदाराने दया-माया न दाखवता त्यांना पट्ट्याने बडवणे सुरुच ठेवले. त्या वेळी झालेला संवाद असा.

 

सालदार- पोहल्यानंतर पळून का गेलात ?
मुलं- चुकी झाली
सालदार- तुला किती वेळा सांगितले या वावरामध्ये येऊ नकोस. तुझ्या वडिलांना किती वेळा समजावले. तुमच्या मागे येणारे आम्ही वेडे आहोत काय?
मुलं- आजच आलो, यापुढे येणार नाही
सालदार - तुझ्या घरी तुला नग्न अवस्थेत नेवू का ? घरच्यांनाही कळेल?
मुलं- माझ्या घरचे गावाला गेले आहे, यापुढे करणार नाही.
सालदार- घरचे नाही तर गाववाले पाहतील तुला नग्न
मुलं- यापुढे दिसणार नाही.
सालदार- जनावरांच्या बाबतीतही तुला समज दिली होती, तिसऱ्यांदा चुकी केली, तुझ्या वडिलांनाही चार वेळा ताकीद दिली होती.
मुलं- पाचव्यांदा दिसणार नाही.

 

दोषींना कठोर शासन
वाकडीची घटना विकृत मानसिकतेतून झालेली अाहे. लहान मुलांसोबत कसे वागावे, याबाबत आपल्या समाजात काही संकेत आहेत. वारंवार सांगूनही विहिरीत उतरले म्हणून कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. दोषीवर सर्व कलम लावण्यात आले आहेत. कठोर कारवाई होईल. मात्र, या प्रकरणाला कोणी जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये.
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

 

कुटुंबीयांनीच सांगितले मुलांना धडा शिकवा
शेतातील विहीर 60 ते 70 फूट खोल आहे. विहिरीत कमी पाणी असते. मुले वरतून उड्या मारतात. शेतात काही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे शेतमालक जोशी यांनी यापूर्वीही मुलांच्या कुटुंबियांकडे तीन ते चार वेळा तक्रार केली होती. त्यावेळी कुटुंबियांनी तुम्हीच त्यांना धडा शिकवा, असे सांगितले होते. यामुळे रविवारी मुले विहिरीत पोहण्यासाठी आली असतांना त्यांना शिक्षा केली. यात त्यांची काहीही चूक नाही. असे मुलांची आई दुर्गाबाई चांदणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून... घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...