आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • 30 टक्के जागा राखीव असताना शिक्षित महिला हक्कापासून वंचित; महिला आयोगाकडे तक्रार Education Scam In North Maharashtra Univercity, Womens Candidate No Chance

30 टक्के जागा राखीव असताना शिक्षित महिला हक्कापासून वंचित; महिला आयोगाकडे तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- 30 टक्के जागा राखीव असतांना शिक्षित महिला हक्कापासून वंचित राहिल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. तक्रारदार शुभांगी दिगंबर चव्हाण यांनी तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोग सदस्या सचिव डॉ.मंजुश्री मोळवणे यांनी महिला आयोग कायद्याने सत्य पडताळणी करून अहवाल 15 दिवसांच्या आत द्यावा, असे पत्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिले आहे.

 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत प्रताप वरिष्ठ महाविद्यालयात 2016 साली झालेल्या भरती प्रक्रियेत शासन निर्णय 16  मार्च 1999 च्या महिलांसाठीचा आरक्षण या निर्णयाची पायमल्ली झाल्याचे उघड झाले आहे. सदर भरती प्रक्रिया 15सहाय्यक प्राध्यापकांची होती. त्यापैकी सदर शासन निर्णय 30 टक्के महिला आरक्षणानुसार 5 महिलांचे पदे भरणे अपेक्षित असतांना ती भरली गेली नाहीत. रिक्त जागा व वेळोवेळी झालेल्या भरती प्रक्रियेत जाहिरातीत पदे असतांना व पात्र महिला उमेदवार उपलब्ध असतांना या अटींचा भंग झाला आहे.

 

भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणमधील 16 मार्च 1999 शासन निर्णय असे जाहिरातीत स्पष्ट असताना सुद्धा महिलांना डावलून पुरुष उमेदवार पदे भरती करून शासनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. आरक्षणप्रमाणे पदे भरलेली नाहीत हे मिळालेल्या माहितीत उघड झाले आहे. याबाबत झालेल्या अन्यायाबाबत सर्व पुरावे गोळा करून राज्य महिला आयोगाकडे उमेदवार शुभांगी दिगंबर चव्हाण यांनी याबाबत तक्रार केली होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... महिला आयोगाने घेतली चव्हाण यांच्या तक्रारीची दखल

 

बातम्या आणखी आहेत...