आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: पतीकडून पत्नीला अमानुष मारहाण, चिमुरडीला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा- माहेरून 5 लाख रुपये आणि दहा तोळे सोने न आणल्याने पतीकडून पत्नीला अमानुष मारहाण केल्याची आणि चिमुरडीला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत सासूही आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोपी पीडितेने केला आहे. पती आणि सासूच्या  सततच्या मारहाणीत जखमी झालेल्या सुनेला ग्रामस्थांनीच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

 

या संपूर्ण घटनेची माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील वाणी समाजाच्या अमृतकर परीवारातील सून उर्मिला तुषार अमृतकर हिला गेल्या आठ दिवसांपासून पतीसह सासूने अमानुष मारहाण करीत असताना गावात कुणीही या भानगडीत पडत नव्हते. मात्र, बुधवारी उर्मिलाचे चुलत सासरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तुषार अमृतकर याने काकांच्या कानशिलात ठेवली. हेपाहून गावातील लोक संतापले आणि त्यांनी दोन्ही माय-लेकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्मिलालावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. पाचोरा पोलिसांना तिचा जबाब नोंदवला आहे.


तुषार अमृतकरचे चौथे लग्न..
उर्मिलाने पोलिसांना सांगितले की, लातूर जिल्ह्यात तिचे माहेर आहे. पती तुषार अमृतकर याने तिची फसवणूक केली आहे. त्याचे हे चौथे लग्न केले. लग्नाला दोन वर्षे झाली. सुरवातीचे सहा महिने चांगली वागणूक दिली मात्र, नंतर माहेरून पाच लाख रुपये आणि दहा तोळे सोने आणावे, या मागणीसाठी पती आणि सासूने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला. गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिलाला उपाशी ठेवण्यात आले होते स्वयंपाक घराला कुलूप लावून तिला उपाशी ठेवले जात असे अशी माहिती तिने दिली. तिच्या तोंडावर उशी दाबून तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला. एवढेच नाही तर तिची एक वर्षाच्या  मुलीला देखील पाण्यात बुडवून मारून टाकण्याचा प्रयत्न केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो

 

बातम्या आणखी आहेत...