आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिका अत्याचार प्रकरण: आदेश बाबाच्या मुसक्या आवळल्या, भीम आर्मीचा धडक मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- खेळण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेश बाबा (वय-60, रा.समतानगर) याला ताब्यात घेतले आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

 

समतानगर परिसरात धामणगाव वाडा भागात राहणारी ही मुलगी सायंकाळी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. तिचे अपहरण केल्याचा करण्यात आल्याचा संशय होता. सकाळी पोत्यात बांधून ठेवलेला तिचा मृतदेह घराजवळील एका टेकडीवर आढळून आला. मुलीचा गळा आवळुन खून करून तिचा मृतदेह पोत्यात बांधून घराजवळ टेकडीवर फेकण्यात आला होता. या भयंकर घटनेमुळे जळगावकर हादरले आहेत.

 

अमरावतीत उमटेले पडसाद...भीम आर्मीचा मोर्चा
जळगाव येथील आठ वर्षीय बालीकेवर अज्ञात नराधमांनी अत्याचार करून व नंतर तिची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. त्या घटनेचे पडसाद अमरावतीत उमटले असून भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

 

याच घटनेचे पडसाद अमरावतीतही उमटले असून गुरूवारी भीम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी व हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा अशी मागणी भीम आर्मीचे प्रदेश सचिव मनीष साठे, शहर प्रमुख बंटी रामटेके, शेख अकबर, अनंता इंगळे, पवन शेंडे, पप्पू पश्चेल, प्रवीण बनसोड, गौतम हिरे, रवि पश्चेल, बाळू ढोके, सुशील काळबांडे, मिलींद सोनोने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केली आहे.

 

खाकीचा वचक संपला...

महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून यामध्ये महिलांवरील अत्याचारात प्रामुख्याने वाढ झालेली दिसून येत आहे. पोलिसांचाही धाक गुन्हेगारांना उरलेला नसून सर्वसामान्यांना पोलिस विभागाकडून संरक्षण मिळणे कठीण झाले असल्याचे मत या वेळी भीम आर्मीचे प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांनी व्यक्त केले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... जळगावात काय घडले बालिकेसोबत...

 

बातम्या आणखी आहेत...