आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात, 25 प्रवाशी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्री- नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगराची लामकानी येथून पहाटे साक्रीकडे येणाऱ्या बसला (एमएच 20 डी 8256) शहरापासून तीन किमी अंतरावर अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनामुळे एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण ढळल्याने हा अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या बुंध्याला धडकली. या अपघातात चालक व वाहक यांच्यासह सुमारे 25 प्रवाशी जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात 21 जणांवर उपचार करण्यात आले. अन्य तीन ते चार जण उपचार न घेताच परस्पर निघून गेले.

 

 

मिळालेली माहिती अशी की, साक्री आगारातून धुळे तालुक्यातील लामकानी येथे आदल्या दिवशी संध्याकाळी मुक्कामी जाणारी बस पहाटे साक्रीला परत येते. बस साक्रीकडे जात होती व साक्रीकडून येणारा डंपर ट्रक भरधाव वेगाने एसटी बस च्या समोर आला. या डंपर ने बसचालकाच्या बाजूने एसटी बसला धडक दिली व न थांबताच भरधाव वेगाने निघून गेला. परंतु या धडकेने एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण बिघडले. बस वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने एसटी बस डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उतरवली. बस रस्त्याच्या कडेला वठलेल्या झाडाच्या बुंध्याला बसचालकाच्या बाजूने जाऊन धडकली. त्यामुळे बसच्या चालक कॅबिनचा चुराडा झाला. बस जोरात धडकल्याने बसमधल्या प्रवाशांना जबरदस्त मुकामार लागला. साक्री शहरापासून केवळ तीन किमी अंतरावर वीज कंपनीच्या 132 केव्ही वीज केंद्रालगत हा अपघात झाला.

प्रवाशांना नागरिकांच्या मदतीने एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.बहुतेक प्रवाश्यांना खरचटले, जखमा झाल्या व मुका मार लागला. रुग्णालयात डॉ.भरत गोहिल, डॉ.श्रीकांत पाटील, डॉ.कुणाल भदाणे आदींनी उपचार केले.

 

अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांची नावे अशी:
निर्मला दत्तात्रय चौधरी, रा.लामकानी (45), दगा आनंदा भामरे, रा.मालपूर (60), कुसुम दगा भामरे, मालपूर (55), विजय अशोक चव्हाण, रा.नागपूर (25), किशोर दौलत शिरसाठ, वर्धाने (39), वैशाली वसंत राठोड, नागपूर (16), दिनेश लहानू थोरात, लखमापूर (18), चेतन वसंत राठोड, नागपूर (18), महेंद्र उमेश बागूल, नागपूर (18), रामदास गोदन ठेलारी, लखमापूर (18), किसन रामदास अहिरे, घाणेगाव (57), देवका भगवान महाजन, रामी (60), दाजभाऊ जयदेव भदाणे, (35), अनिता दाजभाऊ भदाणे,(32), प्रणाली दाजभाऊ भदाणे (10), हर्षदा दाजभाऊ भदाणे, (05) सर्व रा.आसाणे, रामचंद्र उत्तम पाटील,सैताळे (73), मुक्ताबाई सदाशिव पाटील, सैताळे (45), दंगल नथू नेरे, वसमार (70),शिवा भिवा मारनर, एसटी बस चालक (40), डोंगर पुंजाराम गावित, एसटी बस वाहक (44).

 

राज्य परिवहन मंडळाच्या आगाराचे प्रमुख पंकज देवरे, श्री वाघ, वाहतूक नियंत्रक संगीता बागूल, बाबा पाटील यांनी जखमींची भेट घेतली. जखमींना तात्काळ द्यावयाच्या मदतीसाठी 'पी फॉर्म'

भरून घेतला. सर्व 19 जखमींना तात्काळ मदत म्हणून पाचशे रुपये देण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातून जखमींना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघातग्रस्त बसचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...