आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • खानदेशच्या सुनबाईची कर्नाटकात भरारी..मनगटाच्या जोरावर सुरु केले सर्व्हिस सेंटर Success Story Of Padmaja Amol Patil For Karnataka Dharvad

खानदेशच्या सुनबाईची कर्नाटकात भरारी..मनगटाच्या जोरावर सुरु केले सर्व्हिस सेंटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- काही व्यवसाय असे आहेत की त्यात अजूनही केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे. परंतु खानदेशातील एका सुनबाईने एक पाऊल पुढे टाकले आहे. खडतर प्रवास करत कर्तृत्वाच्या जोरावर परराज्यात जाऊन स्वत:चे सर्व्हिस सेंटर सुरु केले आहे. पद्मजा अमोल पाटील असे या महिलेचे नाव असून तिने साई ऑटो लीड्स नावाचा स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे.

 

इचलकरंजी येथील माहेर असलेल्या पद्मजा पाटील यांचा विवाह खानदेशातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील राहाणारे अमोल पाटील यांच्याशी झाला. अमोर पाटील यांचे अधिकराव पाटील यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते कर्नाटकातील हुबळीमधील धारवड येथे स्थायिक झाले आहेत. 12 वीपर्यंत शिक्षण झाले पद्मजा यांनी धारवाड येथे एका शोरूमशी करार करून सर्व्हिस सेंटर सुरु केले आहे.

 

पद्मजा या विवाहनंतर सासरी (धारवड) आल्यानंतर त्यांना कानडी भाषा येत नव्हती. मात्र, पाटील हे कर्नाटकात राहात असले तर या कुटुंबात मराठीसह अहिराणीही बोलली जाते. पद्मजा यांनी हळूहळू कानडी भाषा आत्मसात केली. घरी रिकामे न बसता व संसाराला हातभार लावावा, हा विचार पद्मजा यांना यांच्या मनात आला. त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्धार केला. जुनी कार विकून मिळालेल्या चार लाखांत पद्मजा यांनी धारवाड येथे भाड्याच्या जागेत वाशिंग आणि सर्व्हिसिंग सेंटर सुरु केले. सोबत शिक्षणही सुरुच ठेवले. या व्यवसायात पुरुषांबरोबर महिलाही पारंगत होऊ शकतात, हे पद्माजा यांनी दाखवून दिले आहे.

 

पद्मजा या आपला व्ययसाय सांभाळून विधवा, परित्यक्त्या आणि घटस्फोटीत महिलांच्या स्वालंबनासाठी काम करतात. सर्व्हिस सेंटरवर सर्व महिला काम करतात, असे कर्नाटकातील हे एकमेव सेंटर आहे.

 

महिन्याकाठी अडीच लाखांची उलाढाल...
पद्मजा यांच्या या व्यवसायाची मासिक उलाढाल ही अडीच लाख रुपये आहे. पद्मजा यांचे महिला स्वालंबीकरण या क्षेत्रात मोठे नाव आहे त्यांचा भारत सरकारच्या कर्नाटक नाबार्डकडून त्यांना यासाठी विशेष सन्मानपत्र मिळाले आहे. तसेच लायन्स क्लब, रोटरी क्लब धारवाडतर्फे तसेच त्यांचे माहेर असलेल्या इचलकरंजी येथे गौरविण्यात आले आहे.

 

अंतकरण फौंडेशन धारवाडकडून गौरविण्यात आले आहे. राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज वसुंधरा महिला उद्योजिका या पुरस्काराने त्यांना इचलकरंजी येथे येत्या 8 जुलै रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. कविता, लेख, कथा लिहिणार्‍या पद्मजा यांचा आष्टा (जि.सांगली) येथील पश्चिम महाराष्ट्र साहित्य कला मंचने गौरव केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मनगटाच्या जोरावर सर्व्हिस सेंटर सुरु केलेल्या खानदेशच्या सुनबाईचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...