आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात गेलेल्या शेतकर्‍यावर पट्टेदार वाघाचा हल्ला; अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर– शेतात गेलेल्या 65 वर्षीय शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला चढवत ठार केल्याची घटना वडोदा वनपरिक्षेत्र अंतर्गत डोलारखेडा फॉरेस्ट कॅम्पार्टमेंट 517 लगत शेती शिवारात काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजता उघडकीस आली. लक्ष्मण गणपत जाधव (65, रा. डोलारखेडा ता. मुक्ताईनगर) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. लक्ष्मण जाधव यांचा वाघाने अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला. वाघाचे अधिवास असलेल्या या जंगलात हा पहिला बळी गेल्याने घबराट पसरली आहे.

 

शेतकरी लक्ष्मण जाधव हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतात गेले होते. अंधार पडल्यावर ही ते परत आले नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय व ग्रामस्थ शेताकडे गेले असता रात्री आठच्या सुमारास त्यांच्या शेतापासून 100 फूट अंतरावर पूर्णा नदीकडे पट्टेदार वाघ काही तरी खात असल्याचे दुरून दिसून आला. गावातून येथे जमाव जमला. पट्टेदार वाघास ग्रामस्थांनी हुसकावून लावले जवळ पोहोचताच मयत लक्ष्मण जाधव यांचे निम्मे शरीर वाघाने खाल्याचे धक्कादायक चित्र उपस्थितीना दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री दहाच्या सुमारास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या वन परिक्षेत्रात चार मोठे पट्टेदार वाघ तर तीन छावे असे एकूण सात पट्टेदार वाघ आहेत तशी अधिकृत नोंद व छायाचित्रे देखील वनविभागाने टिपली आहेत. अलीकडे एक वयोवृद्ध पट्टेदार वाघ सातत्याने नजरेस पडत आहे आजचा हा नरभक्षक पट्टेदार वाघ नेमका कोणता याचा शोध घेण्याबाबतचे आव्हान वनविभागासमोर आहे तर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...