आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर (नंदूरबार)- वाकीपाडा परिसरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात जागतिक महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 'बेटी बचाओ'चा लोगो विद्यार्थिनींनी तयार केला.  'बेटी बचाओ बेटी पढाओ, शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 

 

नवापूर शहरातील बेटी बचाओ समितीचे प्रमुख प्रदिप हिरे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जीजाबाई हिरे, भाग्यश्री हिरे, वंदना हिरे, मैत्री ग्रुपच्या कमल शाह, रूपाली काथावाला, भुमी शाह, मुख्याध्यापिका ज्योती कापुरे, योगेश पाटील, निलिमा पाटील, उषाकांत नाईक, सीमा दाभाडे, मीराबाई पाटील, सविता पिंपळे, हेमलता वळवी आदी उपस्थित होते.

 

 

सर्व शिक्षा अभियान व मानव विकास मिशन जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर येथील विद्यार्थिनी यांना शैक्षणिक साहित्य जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जिजाबाई हिरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या मनोगत व्यक्त केले.

 

 

पुढील स्लाईडवर VIDEO

बातम्या आणखी आहेत...