आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
केंद्र सरकारच्या उडान याेजनेंतर्गत २६ डिसेंबर राेजी जळगाव-मुंबई विमान सेवेला सुरुवात झाली. तीन महिन्यात अाठवड्यातून तीन वेळा विमान फेऱ्यांची सुविधा देण्यात अाली. यातही तीन वेळा कंपनीतर्फे सेवा बंद ठेवण्यात अाली हाेती. २४ मार्चपासून कंपनीतर्फे प्रथमच चार दिवस सलग विमानाच्या तिकिटाचे बुकिंग बंद करून सेवा थांबवण्यात अालेली हाेती. ही सेवा २७ मार्चपर्यंत बंद राहणार अाहे. मात्र, साेमवारपासून विमान सेवेच्या तिकिटाचे बुकिंग सुरू हाेणार अाहे. त्यानंतर मंगळवारपासून जळगाव-पुणे विमान सेवा देखील सुरू करण्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात अाला असल्याने जळगावकरांची माेठी साेय हाेणार अाहे.
विमान सेवा बंद हाेणार नाही
विमान फेऱ्या अचानक रद्द हाेणे नित्याचेच झाले आहे. शिवाय सध्या विमान सेवा बंद हाेणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. यासंदर्भात विचारले असता एअर डेक्कन कंपनी ही अागामी १०-१५ वर्षांचे नियाेजन करून या सेवेत उतरली असून त्यादृष्टीने वाटचाल सुरू अाहे. काेणत्याही परिस्थितीत अर्ध्यात विमान सेवा बंद करण्यात येणार नसल्याचे कंपनीचे राष्ट्रीय व्यवस्थापन प्रमुख जीगर थालेश्वर यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या प्रमुखांनी दिला हाेता शब्द
जळगावात विमान सेवा उद्घाटन कार्यक्रमात एअर डेक्कन चार्टर सर्व्हिसेस या कंपनीचे प्रमुख कॅप्टन गाेपीनाथ यांनी अापल्या भाषणात जळगाव शहराशी असलेले ऋणानुबंध उलगडून वर्षभरात जळगाव-पुणे सेवा सुरू करण्याचा शब्द दिला हाेता. मात्र, अवघ्या तीन-चार महिन्यातच जळगाव-पुणे विमान सेवा सुरू करून कंपनी सुखद धक्का देत अाहे.
तांत्रिक कारणामुळे ४ दिवस सेवा बंद
कंपनीकडे असलेल्या विमानाच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या अाठवड्यात चार दिवस विमान फेऱ्या रद्द करण्यात अाल्या हाेत्या. कंपनीकडे अाता ४ विमाने अाहेत. कंपनी अाणखी ७ विमाने खरेदी करणार अाहे. ही अत्याधुनिक विमाने असल्याने प्रशिक्षित विदेशी पायलटची नेमणूक करण्यात अाली अाहे. विमान प्राधिकरणाकडून या विदेशी पायलटच्या विविध चाचण्या गेल्या अाठवड्यात घेण्यात अालेल्या अाहेत. काही चाचण्या सुरू अाहेत. त्यामुळे या सेवेला विलंब हाेत अाहे. मात्र, येत्या दाेन दिवसांत तांत्रिक अडचणी व पायलटच्या चाचण्या संपून विमान फेऱ्या सुरू हाेणार अाहेत.
जळगाव-पुणेसाठी १६ अासनी विमान असणार : थालेश्वर
जळगाव-पुणेसाठी १६ अासनी विमान असणार असून विमानाचे तिकीट हे मुंबई फेरी प्रमाणे दाेन ते अडीच हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता थालेश्वर यांनी वर्तवली अाहे. ही सेवा जळगाव-मुंबई प्रमाणे अाठवड्यातून तीन दिवसांचे वेळापत्रक सुरुवातीला न राहता प्रायाेगिक तत्त्वावर असणार असल्याचे थालेश्वर यांनी सांगितले. या साेबतच एअर डेक्कन कंपनीतर्फे मुंबई-काेल्हापूर ही विमान सेवा सुरू करणार अाहे. दरम्यान, जळगाव येथून पुणे येथे जाणाऱ्याची संख्या माेठ्या प्रमाणात असून या विमान सेवेमुळे प्रवाशांची माेठी अडचण दूर हाेणार अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.