आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दुसरे काहीही नकाे, केवळ त्यांच्या शेतमालाला याेग्य भाव द्यावा, बाकी काहीही तत्त्वज्ञान सांगण्याची गरज नाही. तसेच सध्या पंजाबमध्ये गव्हावर तांबाेळा राेगाचे तर अापल्याकडे कापसावर बाेंडअळीचा प्रादुर्भाव अाहे. भविष्यात केळीवरदेखील संकट येऊ शकते; हे लक्षात घेऊन या संकटांचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज असल्याचा सल्लाही नसल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
जैन इरिगेशनतर्फे शुक्रवारी जैन हिल्स येथे पद्मश्री अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च व तंत्र पुरस्कार वितरण सोहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. याच कार्यक्रमात जैन फूड्सच्या मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन झाले. वडनरे भैरव (ता.चांदवड) येथील शेतकरी रश्मी व अविनाश पाटाेळे यांचा २ लाख रुपये, स्मृतिचिन्ह देऊन पद्मश्री अप्पासाहेब पुरस्काराने गाैरवण्यात अाले. खासदार पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
देशातील शेतकऱ्यांचा विचार आधी झाला पाहिजे. वस्तू उत्पादित करणाऱ्यांपेक्षा आपल्यापर्यंत घास पोहोचवणाऱ्या उत्पादकाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा, असे पवार म्हणाले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जैन उद्याेग समूहाचे अध्यक्ष अशाेक जैन, माजी मंत्री एकनाथ खडसे, अामदार हरिभाऊ जावळे, डाॅ. सतीश पाटील, सुरेश भाेळे, संजय सावकारे, किशाेर पाटील, चंद्रकांत साेनवणे, शिरीष चाैधरी, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील, माजी अामदार सुरेश जैन, अरुण गुजराथी, गुरुमुख जगवाणी, विभागीय अायुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर, पद्मश्री ना. धाें. महानाेर उपस्थित होते. अशाेक जैन यांनी अाभार मानले.
दिल्ली गंमतीशीर शहर
दिल्ली हे एक गमतीशीर शहर अाहे. येथे एक दाणाही उगवत नाही. अापण पिकवलेले अन्नधान्य त्यांना देताे, तरीही त्यांना सर्व स्वस्त हवे असते. शेतमालाचे भाव वाढले तर महागाई वाढते. खतांच्या किमती वाढल्या तर महागाई कमी होते, ही राजधानीतील तज्ज्ञ मंडळींची विचारधारा व मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे खासदार पवार म्हणाले. पाेटाची समस्या साेडवण्याची क्षमता केवळ शेतकऱ्यांमध्ये अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने साेडवण्याची मागणी पवारांनी केली.
भंवरलाल जैन यांच्या अाठवणी जागवल्या
जळगावात अाल्यानंतर भंवरलाल जैन यांच्याकडे नेहमी चक्कर असायचा. ते हयात असताना अनेक वेळा शेतीसंदर्भात त्यांच्याशी सखाेल चर्चा, सुसंवाद असायचा, तात्विक वादही व्हायचे परंतु त्यांचे अामच्याशी स्नेहाचे संबंध हाेते. ते गेल्यानंतर त्यांची उणीव भासते. भवरलालजींचे कार्य खराेखरच माेठे असल्याचा उल्लेख पवार यांनी केला.
मंत्र्यांकडून पवारांवर स्तुतिसुमने
पुरस्कार सोहळ्यासाठी अालेले कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर अाणि सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री बबनराव लाेणीकर यांनी खासदार शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. कृषिमंत्री फुंडकर यांनी लोकनेते अाणि अामचे नेते असा पवारांचा उल्लेख केला. तर मंत्री लाेणीकर यांनी शरद पवार हे शेतकऱ्यांचे ब्रँड अँबेसेडर असल्याचे सांगितले. त्यांच्या शेतीतील ज्ञानामुळेच पंतप्रधान नरेंद्र माेदी अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे मार्गदर्शन घेत असल्याचेही ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.