आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल तालुक्यात बामणोद येथे दहावीच्या विद्यार्थ्यांवर युवकाचा चाकुहल्ला; 4 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- तालुक्यातील बामणोद येथे पीएसएमएस हायस्कुलमध्ये गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास इयत्ता दहावीचा इंग्रजी पेपर सुरु होण्यापुर्वी विद्यार्थांना केंद्रावर सोडताना विद्यार्थांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने चौघांवर चाकुने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

 


या चाकु हल्ल्यात रूपेश गुणवंत ननवरे (वय 19), गौरव अरूण सोनवणे (वय 15), सागर भिमराव सोनवणे (वय 22), मोहित गोपाळ सोनवणे (वय 18, सर्व रा. बामणोद) हे जखमी झाले. हा चाकुहल्ला करणाऱ्या युवकाला फैजपुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...