आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुपाटबंधारे विभागाचे वाहन अन‌् संगणक जप्तीची नामुष्की

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील धरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या शेतीचा ४ कोटी रुपये वाढीव मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्यांनी मंगळवारी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एफ.गावित यांच्या शासकीय वाहनासह दोन संगणक जप्त केले आहेत. 


सन २०१६मध्ये या शेतकऱ्यांच्या जिरायत शेतजमीनीला ८ लाख रूपये प्रती हेक्टर व बागायत शेतजमीनीला १६ लाख रूपये प्रती हेक्टर मोबदला निश्चित करण्यात आला होता. न्यायालयाने हा मोबदला देण्याचे आदेश दिलेले होते. परंतु, तापी महामंडळाने शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देऊन परत पाठवले. तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक व लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित शेतकऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार मोबदला द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र, त्यांनी मोबदला दिला नाही. त्यामुळे मंगळवारी संबंधित शेतकरी व अॅड.एन.आर.लाठी यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार लघुपाटबंधारे विभागाला जप्ती वारंट बजावण्यात अाले हाेते. 


त्यामध्ये एम.एच. १९ एम. ८१९ या क्रमांकाचे शासकीय वाहन, दोन संगणक, प्रिंटर जप्त करण्यात आले अाहेत. शेतकऱ्यांना ४ कोटी रूपये मोबदला घेणे आहे. कार्यकारी अभियंता यांनी रक्कम न दिल्याने जप्ती वारंट बजावले. शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे जप्ती वारंट बजावण्यात आलेले आहे. शासनाला १५ टक्के व्याजाचा भुर्दंड अधिकाऱ्यांमुळे भरावा लागत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन धरणासाठी संपादित करण्यात आलेली आहे. दरम्यान, या कारवाईची परिसरात माेठी चर्चा हाेताना दिसून अाली. 


जिल्हाधिकाऱ्यांचेही वाहन जप्त करणार 
उर्वरित जप्ती वारंट जिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी व तापी महामंडळ यांना १४ जून रोजी बजावण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांची वाहनेही जप्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी न्यायालयाने तापी महामंडळाचे अकाऊंट स्टेटमेंट मागविले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...