आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हाट्सअॅप गृपच्‍या सहाय्याने झाली माय-लेकराची भेट;बस पकडताना झाली होती ताटातूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- झोडगे बस स्‍थानकावर बस पकडण्‍याच्‍या घाईमध्‍ये आई आणि 5 वर्षाच्‍या मुलाची ताटातूट झाली होती. एसटी कर्मचा-याने प्रसंगावधान दाखवत व्‍हाट्सअॅप गृप वर टाकलेल्‍या मेसेज मुळे अवघ्‍या अर्धा तासातच दोघांची भेट झाली. सदर घटना गुरूवारी दुपारी 12 वाजेच्‍या  दरम्‍यान  डघली. 

 
याविषयी अधीक माहिती अशी की, धुळे बसस्‍थानकातून नाशीकला जाण्‍यासाठी जळगाव-नाशीक (बस क्र. एम.एच. 20-2932) व चोपडा- नाशीक ( बस क्र. एम.एच.10-3406) या दोन बस निघाल्‍या होत्‍या.  दोन्‍ही बस झोडगे बस स्‍थनकावर आल्‍यानंतर 5 वर्षाच्‍या मुलाला घेऊन एक आर्इ जळगाव-नाशीक बस मध्‍ये बसण्‍यासाठी पुढे सरसावली मात्र गर्दी जास्‍त असल्‍याने त्‍यांनी मागून आलेल्‍या चोपडा-नाशीक बस कडे धाव घेतली. बस मध्‍ये बसल्‍यानंतर त्‍यांच्‍या लक्षात आले की, मुलगा सोबत नाही. हा प्रकार लक्षात येताच मुलाच्‍या आईने टोहो फोडला. यावेळी बस मधील वाहक किरण चव्‍हाण यांनी प्रसंगावधान दाखवत व्‍हाट्सअॅप गृप वर मेसेज टाकून घटनेची माहिती दिली. या मेसेज  नंतर मुलाग पुढील बस मध्‍ये असल्‍याचे कळले. दोन्‍ही बस मालेगाव स्‍थानकात येताच माय लेकरांची भेट झाली. यावेळी बस कर्मचा-यांनी दाखवलेल्‍या प्रसंगावधनाचे सर्वर कैतूक झाले. 

बातम्या आणखी आहेत...