आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल (जळगाव)- तीन तलाक रद्द केल्याच्या विरोधात गुरुवारी (दि.15) यावलला वाजीद फाउंडेशनच्या वतीने महिलांनी मुकमोर्चा काढत तहसिल कार्यालयात निवेदन दिले. मुस्लिम वुमेन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज) अॅक्ट 2017 हा कायदा रद्द करा अशी मागणी यावेळी मुस्लिम महिलांकडून करण्यात आली.
शहरातील वाजीद फाऊंडेशनच्या वतीने गुरूवारी शहरातुन महिलांनी मुक मोर्चा काढला. सकाळी 11 वाजता बरूज चौकात फाऊंडेशनचे पदाधिकारी व महिला एकत्र आल्या व त्यांनी शहरातुन मुक मोर्चा काढला. शिस्तबध्द पध्दतीने हा मोर्चा तहसिल कार्यालयात दाखल झाला. येथे महिलांच्या वतीने नायब तहसिलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुस्लिम वूमेन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज) अॅक्ट 2017 हा कायदा केंद्र सरकारने लोकसभेत घाईत मंजूर केला. कायद्याच्या मुसद्याला धार्मिक नेते आणि समाजातील बुध्दीवंताशी सल्लामसलत केल्याशिवाय प्रक्रियेला पाठवले आहे. 22 ऑगस्ट 2017 च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या कायद्याच्या मुसद्याची काहीच गरज नव्हती. या कायद्यातील मजकूर भारतीय घटनेविरूध्द आहे. मुस्लिम स्त्री व मुलांच्या विरूध्द आहे. या कायद्याचा मुसदा समाजविरोधी आहे. यावेळी जरीनाबी शेख, हुस्नाबानो शेख, जमीलाबी शेख, शहनाजबी शेख, रूखसानाबी खान, इस्माईल खान, परवेज खान, शाहरूख खान, शाहिद खान, सद्दाम खान, सज्जाद खाटीकसह मोठ्या संख्येत फाऊंडेशनचे कार्यकर्ते व महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.