आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये मुस्लीम समाजाच्या महिलांचा मोर्चा; तलाक पध्दतीत बदलास विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल (जळगाव)- यावल शहरात मंगळवारी (दि.20) सरकारकडून मुस्लीमांच्या तलाक पध्दतीत बदल करण्यात येत असल्याने त्या विरोधात मुक मोर्चा काढण्यात आला. तहसिलदार आणि पोलिस प्रशासनास निवेदन देण्यात आले. तसेच मागण्यांची दखल न घेतल्या थाळी नाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

 


मोर्चेकरी सकाळी 9 वाजता शहरातील आठवडे बाजार परिसरात एकत्र आल्या. तेथुन दिल्ली गेट, सुदर्शन चौक, बाबूजीपूरा, मेनरोड, खिर्णीपुरा मार्गे बुरूज चौकाकडून थेट तहसिल कार्यालयावर साडेदहा वाजता मोर्चा गेला येथे तहसिलदार कुंदन हिरे, व पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात डॉ. सायरा किरण तडवी, जरीनाबी शेख, हुस्नाबानो शेख, जकीरा शेख, शेख इकबाल, नसरूद्यीन शेख, सैय्यद ताबीशशेख साजीद, तस्लीम पिंजारी, सिताराम पारधे, कलीम शाह, शेख वकार यांच्यासह हजारो महिलांचा विरोध होता. सरकारकडून समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...